Followers

Tuesday, 13 August 2019

लिंगाणा किल्ला

🔹🔰🔹🔰🔹🔰🔹🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           🦋किल्ले माहीती🦋
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹💜🔹💜🔹💜🔹💜🔹♦🔹

📙
लिंगाणा किल्ला 📙
*******

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड
श्रेणी : अत्यंत कठीण

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे कातळ २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह होते. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय होता. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद होत असत.
🌴इतिहास📜 :मोर्‍यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत. ( रायगडाची जीवनकथा पृ ३,४) १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. ( रायगडाची जीवनकथा पृ २४) लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाच्या रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. ( रायगडाची जीवनकथा पृ १३०) या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती.( रायगडाची जीवनकथा पृ १३१).लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. ( रायगडाची जीवनकथा पृ १३५) तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली ( रायगडाची जीवनकथा पृ १३९).रायगड नंतर लिंगाणा पडला रायगडाच्या खोर्‍यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले. ( रायगडाची जीवनकथा पृ १८८)
🌴पहाण्याची ठिकाणे👀 :लिंगाण्या वरील गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे राहू शकतात. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की, आपण एका कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्‍या आहेत, ज्या वरती असलेल्या गुहांपर्यंत जातात. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे.
लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका आहे. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत: घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आगळाच आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.
🌴पोहोचण्याच्या वाटा🛣 :या गडावर जाण्यास प्रथम आपणास महाडला यावे लागते. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर पुढे घसरड्या वाटेवरून आपण अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.

राहाण्याची सोय :
गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरड्या वाटेवर थोड्या पुढे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून ८ ते ९ तास लागतात.
⭕सूचना :
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment