राणी अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ : किल्ले महेश्वर
किल्ले महेश्वर, जि.खरगोण (मध्यप्रदेश)
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४.
महेश्वर किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी यांची समाधी. |
होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर
जि.खरगोण(मध्यप्रदेश) येथे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे
निधन झाले. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन(अग्नी देणे)
करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर
किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या
समाधीचा निर्माण करण्यात आला. त्यांची समाधी "अहिल्येश्वर छत्री मंदिर"
यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर
त्यांचे अंत्यविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले, ते श्रीमंत
सुभेदार तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचे धाकटे बंधू होय. किल्ल्यावरील राणी
अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब
होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या
धर्मपत्नी होय.
No comments:
Post a Comment