Followers

Thursday, 1 August 2019

"पांढर पाणी"येथील विहिर..





"पांढर पाणी"येथील विहिर... पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे दरम्यान एक छोटस पांढरपाणि नावाच एक खेड गाव लागत हे गाव जरी छोट असल ना पन ह्या गावाचा इतिहास फार मोठा आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून निसटले ना तेव्हा त्यांना वाटेत भुख लागली असता,, तेव्हा ह्या गावात थांबले होते व त्यांच्या जेवनाची सोय एका (माऊली) आजीबाईनीं केली होती.
त्यांचे आडनाव चाचे होते असे समजले ,,महाराजांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्या माऊलीचे आभार मानले.. आणि त्या माऊलींना विचारले बोला तुम्हाला काय हवे आहे. तेव्हा ती माऊली म्हणाली आम्हाला दुसर काहि नाही पाहिजे राज.... फक्त आम्हाला व आमच्या लेकरा बांळाना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्या बस एवढच बाकी काही नाही पाहिजे राज.... माझ्या रांजानी दिलेला शब्द तर ते पाळनारच ना हिच ती शिवकालीन विहीर आज पण हि विहीर एवढे दिस झाले तरी हि इतिहासाची साक्ष देत ताट मानेने उभी आहे. अजून पण ह्या विहीरीची दुरुस्ती करायची गरज पडली नाही. अजून पण इथले लोक ह्याच विहिरीचे पाणी पितात...
जिकडे माझ्या राजांच.....
पाऊलखुणा ना...
तिकडे च आमच मस्तक ,,नतमस्तक होत...
🙏🚩जय शिवराय 🚩🙏

No comments:

Post a Comment