हा वाडा पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या
वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे . या वाड्याच्या सर्व भिंती या
पडलेल्या आहेत. हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम)
यांनी आपल्या राज्यकाळात बांधला. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम)
यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर-वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी
वाघमारे-पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना
चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले. श्रीमंत
उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व श्रीमंत गौतमाबाई
होळकर यांच्या कन्या होत्या.
येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव
मंदिर व त्यामधील नंदी, लक्ष्मी नारायण मंदिर, काळभेरनाथ मंदिर, बिरोबा
मंदिर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला नदी घाट, तसेच श्रीमंत
सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांचे नातू अवचितराव वाघमारे-पाटील(श्रीमंत
उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांचे पुत्र) यांनी पितृ
उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी. हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा
उत्तम नमुना आहे. या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती
दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून होळकर
कालीन शिलालेख नजरेस पडतो. येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील
होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन
नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो. नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या
वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे.
येथील समाधीवर झाडे झुडपे येताना दिसतात ते वेळेत साफ केले नाहीतर येणाऱ्या
काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.
येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा
प्राप्त झालेला आहे. त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर
डागडुजी होणे आवश्यक आहे. येथे येण्याचा पुण्यावरून मार्ग :-
पुणे-राजगुरुनगर-मंचर-पिंपळगाव(महाळूगे)-खडकी .
|
वाड्याचे प्रवेशद्वार(हत्ती दरवाजा) |
|
बाबुराव व उदाबाई वाघमारे(होळकर) यांची संयुक्त समाधी |
|
समाधीच्या आतील होळकर कालीन शिलालेख |
|
घोडगंगा नदीवरील होळकर कालीन नदीघाट |
तेथील समाधीमधील असलेल्या शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :-
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया
उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम
संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द(वडील) मानाजी
पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या
उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ
छत्रीचे काम केले असे .
शिलालेख मजकूर माहितीसाठी आभार :
दैनिक भास्कर
No comments:
Post a Comment