तसा हा जलदुर्ग प्रकारातला किल्ला. समुद्राच्या अगदी लगतच वसलेला. काबो दी रामा म्हणजे पोर्तुगीज भाषेत केप ऑफ राम. केप म्हणजे समुद्रात घुसलेलं भूशिर. म्हणजे भगवान रामाचं वास्तव्य असलेलं ठिकाण. पोर्तुगीजांनी ज्या सोंदा राजांकडून हा किल्ला घेतला, ते रामाचे भक्त होते. त्यावेळी किल्ल्यावर रामाची पूजाअर्चना चालत असावी, त्यामुळेच हे नाव त्यांनी दिलं असावं. खूप मागचा संदर्भ शोधायचा तर सीता व राम हे वनवासात गेले असताना या ठिकाणी राहायचे अशी वदंता आहे.
प्रवेशद्वाराच्या आधी एक चांगली लांब-रुंद चरी खोदलेली आहे. जी आता झुडुपांनी व गवताने बुजलीय. ती थेट समुद्रापर्यंत जाते. पूर्वीच्या काळी इथून पाणी वाहत असे. भरतीच्या वेळी समुद्राचंही पाणी आत येत असेल. या चरीमध्ये मगरी सोडलेल्या होत्या.
गोव्याला गेल्यावर गोव्यातल्या ५० किल्ल्यांपैकी हा एक पाहावा असा सुंदर किल्ला तुम्ही देखील कधीतरी पाहून या...
जय जिजाऊ जय शिवराय
No comments:
Post a Comment