गोव्यात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि पोर्तुगीज यांच्या जवळपास 400 वर्षेच्या कारकिर्दीत अजिंक्य राहिला..पोर्तुगीज भारत सोडून गेल्यावर 1962 साली हा किल्ला भारतीयांच्या ताब्यात आला..
आग्वाद म्हणजे पोर्तुगीज भाषेत ‘पाणी’. आग्वाद किल्ल्यावर २० लाख Gallon पाण्याचा साठा आहे. या शिवाय दिपस्तंभ, खंदक, भरभक्कम तटबंदी, वैशिष्ट्यपूर्ण जीने आणि समुद्राच्या लाटांवरुन तरळत थेट श्वासातून आरपार जाणारा आल्हादायक वारा. ‘आग्वाद किल्ला’ हा एक पुळणीवरच्या टेकाडावर बांधलेला एक भव्य किल्ला आहे. एके काळी गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज कारभाऱ्यांचं सत्ताकेंद्र. आग्वाद किल्ला पहायचा तर ताज हॉटेल जवळील लोअर आग्वाद पाहायलाच हवा. समुद्रावर धडाकणाऱ्या लाटांना छेदत उभां ठाकलेला विशाल बुरुज, इथे कुण्या एके काळी जहाज उभी करत असं म्हणतात. आग्वाद किल्ल्याचा काही भाग टाटांच्या हॉटेल साठी देवून टाकला आहे तर दक्षिण तटावरील काही भाग सेंट्रल जेल साठी. अप्पर अग्वाद साठी जाणऱ्या रस्ता सोडून डावीकडे सेंट्रल जेल कडे गेल्यास, जेलच्या दरवाजासमोर डावीकडील पायवाटेने खाली उतरताच आग्वाद किल्ल्याचा विस्तीर्ण असा दक्षिण तट पहायला मिळतो.
जय जिजाऊ जय शिवराय
7588002780
No comments:
Post a Comment