Followers

Monday 19 April 2021

#पारवडी किल्ला गढी















 

#पारवडी किल्ला गढी
बारामती तालुक्यात आशा 4 ते 5 गढया आहेत त्यातली च ही पारवडी गावातील असणारी गढी येथे पोहचण्यासाठी आपल्याला बारामती भिगवण रोड वरून बारामती पासून 11 किलोमीटर वर पारवडी फाटा लागतो तिथून जैनकवाडी नंतर पारवडी गाव येते गावाच्या आता प्रवेश करते वेळी आपल्याला ही भव्य गढी च दर्शन होत
ही गढी कोणी बांधली हे नक्की सांगता येत नाही पण गावात अधिक चौकशी केली असता पेशवे काळात कोणी धनगर राजा होता त्याने ही बांधली अस सांगितलं जातं आपण आपण गढी जवळ पोहचल्यानंतर समोरचे 2 भव्य बुरुज दृष्टीस पडतात
असे या गढी ला एकूण 4 बुरुज आहेत गढी चा आकार चौकोनी असून गढी ला चारही बाजूने भक्कम तडबंदी आहे गढीच्या समोर एक आत प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहे परंतु त्याला सध्या दरवाजा नाही असेल दुसरे छोटे प्रवेशद्वार गढी च्या उजव्या बाजूला आहे. गढी मध्ये प्रवेश करते वेळी तटबंदी वर जाण्यासाठी दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत तुम्ही एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने उतरू शकता पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपण चार बुरुज पाहू शकतो हे बुरुज या गढीच्या संरक्षणासाठी बांधल्या आहेत बुरुजावर जंग्या आणि टेहळणी करण्यासाठी छोट्या खिडक्या ठेवलेल्या आहेत बुरुजा च्या आत जाण्यासाठी छोटे गुप्त दरवाजे ही आहेत नीट पाहिलं असता ते समजून येत अशा पध्दतीचे 4 बुरुज आहेत सारख्याच अंतरावर आहेत
आपण हे बुरुज पाहून दुसऱ्या पायऱ्या वरून खाली उतरतो त्यानंतर गढी मध्ये सध्या कोणतेही बांधकाम दिसत नाही ते नामशेष झालेले आहेत ताटबंदीला जागोजागी देवळ्या आहेत तसेच आता एक दारुगोळा नाहीतर धान्य ठेवण्यासाठी तळघर दिसते गढीचे दुसरे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच्या च तटबंदी च्या खाली एक छोटा चोर दरवाजा आहे आता तो उघडा दिसतो परतू ज्यावेळी किल्ला बांधला त्यावेळी तो आणीबाणी च्या वेळी उघडला जात असावा अशी ही पारवडी ची गढी आहे अपरिचित असून आपण एकदा नक्की या गढीला भेट देऊ शकता
अमित भगत
पूर्ण गढी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा

No comments:

Post a Comment