Followers

Wednesday 10 March 2021

पेणजवळच्या “सांकशीचा किल्ला”.

 



पेणजवळच्या “सांकशीचा किल्ला”...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सांकशीचा हा किल्ला पेणच्या ईशान्सेस आहे हा किल्ला निडिवली गावाच्या हद्दीतील एका उंचशा टेकडीवर आहे पूर्वी कधी काळी हा सांक नावाच्या अधिपतीच्या ताब्यात होता त्यावरून किल्ल्यास सांकशी हे नाव पडले आहे निडिवली गावात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुस्लीम संत बद्र्रुद्दीन याच्या दर्ग्यावरून त्याला बद्रुद्दीनचा किल्ला किंवा दर्ग्याचा किल्ला असेही म्हणतात...
१६ व्या शतकाच्या पूर्वार्धात हा किल्ला गुजरात सुलतानाच्या (अहमद शहा) ताब्यात गेलेला दिसतो इ.स १५४० मध्ये अहमदनगरचा सुलतान बुरहान निजामशहा पहिला १५०९-१५५३ याच्या एका तुकडीने हा किल्ला गुजरात शिबंदीकडून जिंकून घेतला गुजरात सेनापतीच्या विनंतीनुसार पोर्तुगीजांनी हा किल्ला परत घेण्यासाठी ३०० सैनिक पाठविले हे सैन्य येत असल्याचे पाहून निजामशाही सैन्याने किल्ला सोडला काही काळानंतर निजामशाही सैन्याने किल्ला घेण्यासाठी पुन्हा चाल केली त्यामुळे गुजरात सेनापतीने किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांकडे सोपविला वसईचा पोर्तुगीज कप्तान डी मेंझेस याने किल्ल्याच्या रक्षणार्थ सैन्य रवाना केले.. दोन सैन्यात चकमक उडाली तथापि निजामशहाशी मैत्री संपादन करण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरॉयने सांकशीचा किल्ला आणि कर्नाळा किल्ला ५००० सोन्याचे परदाव एवढ्या रकमेच्या बदल्यात बुरहान निजामशहा पहिला यास सुपूर्द केले..
शिवाजी महाराजांचा सरदार आबाजी सोनदेव याने तो स्वराज्यात दाखल करून घेतला.. तो १८१८ मध्ये ब्रिटिशांकडे आला सन १८६६ पर्यंत सांक्षी हे एका उप-विभागाचे मुख्यालय असून त्यात १९८ खेडी समाविष्ट होती हे मुख्यालय १८६६ मध्ये पेणला हलविल्यानंतर सांकशीचे महत्त्व कमी झाले...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : Being Travelkar...👌🏼♥️

No comments:

Post a Comment