Followers

Sunday, 7 March 2021

गड-किल्ल्यांचे संवर्धन का झाले पाहिजे...?

 


गड-किल्ल्यांचे संवर्धन का झाले पाहिजे...?
राजस्थान आणि उत्तरप्रदेश पेक्षा महाराष्ट्राचा इतिहास फार वेगळा आहे. राजस्थान मधले गडकिल्ले जशास तसे, उत्तरातले महाल ते पण जशास तसे, दिल्लीचा लाल किल्ला तो पण जशास तसा, आग्रा चा ताजमहल तो पण जशास तसा, आणि आपलं सगळं ढासळलयं पण त्यांचं तसं का आहे..? आणि आपलं असं का आहे..? माहिती आहे कारण जेंव्हा जेंव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेंव्हा तेंव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या आमच्यावर जेंव्हा जेंव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या आम्ही छात्या फाकवल्या. (ये... ये... लढ) मान्य करतो की त्यांच्या भिंतिमधून मद्याचे प्रवाह वाहीलेत आणि आमच्या भिंतीमधून रक्ताचे पाठ धावलेत.
अभिमान आहे की माझ्या किल्ल्याचा बुरुज ढासळला.. हो ढासळला स्वराज्याचं रक्षण करताना को तोफेचा गोळा खाऊन ढासळला, तटबंदी कोसळली हो मान्य आहे कोसळली पण स्वातंत्र्याचे रक्षण कसं करावं हे सांगताना कोसळली.पण जेवढं ढासळयं कोसळयं तेवढं ठीक आहे पण उरलेले तरी आपण जपायला हवं, वाचवायला हवं, टिकवायला हवं,नाहीतर रामायण घडले काय असं विचारणारे उद्या चालून विचारतील खरंच छत्रपती शिवाजी महाराज ही जन्माला आले होते का..? आणि पुरावे म्हणून दाखवायला गेलं तर आमच्याकडे गडकोट सुद्धा नसतील.
अहो... त्या अमेरिकेला इतिहास नाही हो अवघ्या साडे तीनशे वर्षांपूर्वी तो देश जन्माला आला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जन्म आहे अमेरिकेचा पण, साडेतीनशे वर्षांपूर्वीचा दगड त्यांनी काचेत ठेवला आहे. दगड काचेत का तर साडे तीनशे वर्षांपूर्वीचा आहे. दगड काचेत का ठेवलाय तर साडे तीनशे वर्षांपूर्वीचा आहे, अहो त्या अमेरिकेने दगडांची स्मारक उभारलीत आणि आपण स्मारकांची दगड करून टाकलीत.
"झाडा कुठलीतरी गडकोट त्या उद्ध्वस्त भिंती सांगतील तुम्हाला पराक्रमी स्वराज्याच्या गाथा,
अजुन ही तिथला एक-एक पत्थर सांगेल मावळ्याच्या बलिदानाची चित्रकथा,
अजून ही तिथला वारा हर-हर महादेव च्या किंकाळ्या तुमच्या कानात सोडेल,
अजूनही तिथल्या कुठल्या मातीमध्ये रक्ताचे डाग तुम्हाला सापडतील जे या मातीसाठी खर्ची पडलेत".
हे गडकोट वाचून आपल्या येणाऱ्या पिढ्याला कळायला हवं की आपले पूर्वज किती पराक्रमी होते तुम्ही पण असेच पराक्रमी व्हालं का..? तुमच्या नसा-नसात त्यांचं रक्त सळसळतं.
आज आपण सर्व मावळे एकत्र येऊन महाराजांचे विचार आचरणात आणून आणि त्या विचारांना कृतीचे बळ देऊन महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य पुन्हा निर्माण करु..
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
🖋️🖋️...लेखक
सोनू कंदुर्के पाटील.
●शिवव्याख्याते● इतिहास अभ्यासक | लेखक | प्रेरणादायी वक्ते
मो/नं-❶.9420242065
❷.8830219615

No comments:

Post a Comment