Followers

Thursday, 4 March 2021

दख्खनी श्रीमंती...किल्ले देवगिरी....!

 


दख्खनी श्रीमंती...किल्ले देवगिरी....!
'बहुत चखोट गड देवगिरी आजही त्याच रुबाबात उभा आहे त्याच डौलाने
यादव कुलाची पताका आपल्या खांद्यावर आजही पेलून आहे जसे त्याने
यादवांची श्रीमंती पहिली तशीच दोन बलाढ्य मराठा सरदार घराण्यात झालेले
भांडण आणि सांडलेले रक्त सुद्धा पहिले....
या देवगिरी पूर्वी सुरगिरी' या नावाने देखिल ओळखला जात असे.. राजा
भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी
स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते या देवगिरीची 'देवगड व
धारगिरी' अशी ही नावे आढळतात.. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर
याचे नाव 'दौलताबादचा किल्ला' म्हणून प्रसिध्द झाले....
देवगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरतो त्या प्रवेशद्वाराच्या
आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे सर्व तटबंदीच्या बाहेरच्या
बाजूस खंदक खोदलेला दिसतो हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या
बाजूने फिरवलेला आहे सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे त्यावरुन
आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो.....
किल्ल्यातील खंदक दुर्गरचना व त्याची योजना :
खंदक शत्रूला किल्ल्याभोवती भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती
विशिष्ट खोलीचा, वेगवेगळ्या दृष्टीने, खोदलेला संरक्षीत चर म्हणजे खंदक
आहे खंदक हा प्रामुख्याने भुईकोट किल्ल्याभोवती खोदला जातो भुईकोट
किल्याभोवती खंदक खोदून एकप्रकारे किल्ल्याला संरक्षीत केले जाते शत्रूला
सहजपणे किल्ल्याला भिडता येऊ नये या साठी केलेली ही खास योजना,
खंदकामध्ये पाणी, मगरी, साप असे प्राणी सोडले जात, जेणेकरुन एक प्रकारे
भुईकोट किल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते खंदकावरून जाण्यायेण्यासाठी
काढता घालता येणारा पूल बसविला जाते....
फोटोग्राफी : पराग सरोदे.

No comments:

Post a Comment