जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी व लेण्याद्री या दोन गावाला जोडणारी एक पुर्व पश्चिम डोंगरांग आहे. याच डोंगररांगेत पश्चिमेला बल्लाळवाडी लेणी (सुलेमान लेणी) समुह पहावयास मिळतो एक खिंड असून एक कच्ची वाट लेण्याद्रीकडुन जवळचा रस्ता म्हणून जाते. जेव्हा आपण या डोंगराच्या खिंडीत पोहोचतो तेथेच हे पाय-या असलेले पुर्व पश्चिम एक तीन खांब असलेले खांबटाके निदर्शनास पडते. आतील एक खांब तुटलेला असून हे टाके व पाय-या गाडलेल्या असल्याने त्याची खोली व विस्तार किती असेल हे निश्चित सांगणे कठीण आहे. या टाक्यातील माती काढून स्वच्छ केले तर उन्हाळ्यात वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न पावसाळ्यात पाणी साचून नक्कीच सुटेल असे वाटते? आपणही एकदा या टाक्यास भेट द्या व जमलेच तर नक्कीच त्यास साफ करून संवर्धन करण्यासाठी योगदान द्या. यापासून ऐतिहासिक वारसा जतन होईल व वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय पण होईल.
लेख/छायाचित्र रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०
No comments:
Post a Comment