#भुईकोट_औसा
औसा किल्ल्याचा सरदार बरखुर्दार औरंबजेबाला पत्र लिहून कळवतो, “शिवाजीचे २०,००० हजाराचे सैन्य या प्रदेशात आले आहे. मराठे हा प्रदेश लुटीत आहेत. आणि लूट गोळा करीत आहेत. त्यांनी किल्ल्यापासून दोन कोसावर आपला तळ दिला आहे. शिवाजीनें माझी जहागिरी लुटली आहे. मला उपजीविकेचे साधन राहिले नाही. मला काही द्रव्य साहाय्य करण्यात यावे.”
यावर औरंगजेबाने दिलेले प्रत्युत्तरात तो म्हणतो, “मराठ्यांनी आपल्याला लुटले आहे हे कारण सांगून अशी अनेक माणसे साहाय्य मागू लागतील. त्यांची गाऱ्हाणी दूर करणे मला कसे शक्य आहे.”
औरंबजेबाच्या उत्तरावरून मराठ्यांनी कित्येक सरदारास नामोहरम केले होते व त्याच्या मुलखात स्वराज्यासाठी मोठ्या लूट केल्याचे दिसते.
संदर्भ : #छत्रपती_शिवाजी_महाराज, पगडी सेतुमाधवराव, नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, १९९८, आवृत्ती दुसरी, पृ. ८८
सोलापूर-तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर औसा हे तालुक्याचे गाव आहे. या गावात एक मध्ययुगीन भुईकोट किल्ला आहे. त्याला औश्या भुईकोट असेही म्हणतात. लातूर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे.
किल्ल्याला संरक्षनासाठी दुहेरी तटबंदी असून तटबंदी च्या बाहेरून रुंदच रुंद खंदक आहे. पुरातत्व खात्याने संवर्धनाचे काम खुप चांगल्या प्रकारे केल्याचे दिसते. पूर्वी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी खंदकावर काढता घालता पूल असावा. एकपाठीमागे एक असे नागमोडे, समोरासमोर नसलेले असे एकूण 5 प्रवेशद्वार आहेत. सध्या किल्ल्यात तोफा पाहायला मिळतात. दुहेरी तटबंदी व त्यावरील तोफा व खंदक या सर्वांमुळे किल्ला बुलंद झाला होता. किल्ल्यात जलमहाल, 3 विहिरी, तहसील कोर्ट, तळघर, कोठारे, जामे मजीत नौघेरी बुरुज आणि नौगजी तोफ, नऊ पाण्याची टाकी आणि नऊ भुईकोटांचा वजीर.. इत्यादी वास्तू पाहायला मिळतात. तसेच आतील भागात काही वास्तूंची पडझड झालेली दिसते. किल्ला पाहण्यास सुंदर असून 1-2 तासात पाहून होतो.
.
बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर खाजा महंमद गवान याने शके १३८२ ला औसा किल्ला बांधण्यास सुरुवात केली व शके १४०३ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले...
शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्व होते हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्व होते इ.स १३५७ मध्ये बहमनी सुलतानने येथे आपली १५४३ सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे इ.स १५४० मध्ये पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता.निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता.
इ. स. १३५७ मध्ये इथे बहामनी सत्ता होती. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. बहमन शाहीच्या विभाजना नंतर हा किल्ला बरीदशाही कडे गेला. तर इ.स. १ मध्ये हा किल्ला निजामशाहा कडे होता. मूर्तिजा निजामाने याचे नाव अंबारापूर असे ठेवले(इ.स.1605). १९ ऑक्टोबर १६०६ रोजी मोगल सरदार मुबारकखान याची नियुक्ती येथे झाली होती.19 ऑक्टोबर 1636 रोजी मोगल सरदार मुबारकखान याची नियुक्ती येथे झाली होती. इ स १७०४ मध्ये औश्याची किल्लेदारी औरंगजेबाने सजावारखान याला दिल्याचे समजते.
मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वीर धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. इ स 1702 मध्ये मराठा सरदार कृष्णा मल्हार यांनी मोगल छावणी कडे जाणारी रसद या भागात लुटली होती. पुढे इ स १७६० च्या पेशवे व निजाम यांच्या उदगीर लढाई नंतर निजामाचा पराभर झाला त्या वेळी हा किल्ला मराठा साम्राज्य ताब्यात आला. पानिपत युद्धात मराठा साम्राज्याची बरीच हानी झाली. या संधीचा फायदा घेत निजामाने हा भुईकोट औसा परत जिंकून घेतला.शेवट पर्यंत निझामाकडे राहिला.हैद्राबादचा उस्मान आली निजाम यांचा संस्थानकडून १८५३ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता त्यांचा ताबा ह्या भागावर १८६१ पर्यंत होता त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटीश कमिशनर म्हणून नळदुर्ग परगाण्याचा प्रमुख होता त्याच्या निवासाची वास्तू किल्ल्याजवळ आहे त्याने अंगुरबाग, जामबाग इत्यादी महत्वाच्या बागा लावल्या होत्या.. त्या आजही या शहरात प्रसिद्ध आहेत.
संदर्भ
१.मराठा रियासत
२.अरूणचंद्र पाठक - मराठवाडा एक शोध.
मोहित मधुकर पांचाळ.
धन्यवाद
No comments:
Post a Comment