Followers

Sunday, 7 March 2021

राजगड

 


राजगड
.
.
 @pratham_dhuri
.
.
राजगड बालेकिल्यावरील१ले ते १० वे शतक ह्या कालखंडांची साक्ष देणाऱ्या लेण्यापासून उत्तर दिशेस थोडे उतरत गेल्यावर आपण एका उत्तरेकडील बुरूजावर येतो. तो नुसता बुरूज नाही, तर ते एक राजघराण्यातील व्यक्तिंचे विश्रांती कक्ष आहे. शिवकाळांतील त्या बुरूजास असलेल्या दगडांतील खांचावरून लाकडी खांबांची साक्ष मिळते. त्याच्यावरील तक्तपोशीवरून आपण त्या विश्रांतीकक्षाच्या भव्यतेची कल्पना करू शकतो. उत्तरेस त्याला एक सज्जा आहे.
शाहीर तुळशीदास ह्याच्या नरवीर तान्हाजी मालुसुरे ह्यांच्यावर सिंहगडच्या पोवाङ्यानुसार आऊसाहेबानी किल्ले कोंढाणा ह्याच सज्जांतून पाहिला.
आज त्या बुरूजाच्या भिंतीना आपला कान लावला तर अजूनहि शब्द ऐकू येतात की, आधी लगीन कोंढाण्याचे! ही नरवीर तान्हाजीची प्रतिज्ञा ह्याच बुरूजांत कडाडली.
महाराष्ट्र देशीच्या जन्मलेल्या, पाळण्यांतील मुठी आंवळणाऱ्या बाळाला आणि जीवनांती बिछान्यावर थरथरणाऱ्या अस्थीपंजराला क्षात्रकुलोत्पन्न मालुसूरे वंशीय तान्हाजी स्मरणीय असतो. स्वतःच्या पुत्राचे लग्न बाजूला सारून "आधी लगिन कोंडाण्याचे!" ही रणगर्जना किल्ले राजगडच्या बालेकिल्ल्यांतील ह्या उत्तर बुरूजांतील जिजामाता वास्तव्याच्या दालनांत घडली.
दुर्दैवाने पद्मावती माची शत्रूने ग्रासल्यास, ह्या बुरूजावरून तोफा पद्मावती आक्रमणाऱ्या गनीमावर आग ओकणार होत्या. हा बुरूज संजीवन माची द्वार, महाद्वार, पद्मावती माची, सुवेळा माची द्वार ह्यांचा रक्षक होता.
त्या बुरूजास डावीकडे पश्चिमेस एक प्रवेशद्वार आहे. सद्या त्याला पायऱ्याहि दिसतात. बालेकिल्ल्याच्या तटबंदीबाहेर खाली उतरत जाणाऱ्या त्या पायऱ्या म्हणजे निश्चितच बालेकिल्ल्यावरील राजघराण्यांतील स्त्री पुरूष व्यक्तिंसाठी बालेकिल्ला ते पद्मावती माची जा- ये करण्याचा मार्ग होता. शिवराय, शंभूराजे, राजमाता, अष्टराज्ञी, कन्यका, दासी व कुळंबीणी त्या मार्गाचा वापर करीत. ह्या मार्गे येत जात. सध्या कालौघांत निसर्गाने त्याची वाताहात झालेली आहे.
साभार : किल्ले राजगड स्थळदर्शन, संकलक ज्येष्ठ इतिहासकार श्री आप्पा परब

No comments:

Post a Comment