Followers

Thursday 4 March 2021

कोरीगड/कोराईगड

मावळतीच्या दिशेला राहून, उगवतिचे स्वप्न पाहणाऱ्या शिवरायांना स्वप्न सत्यात उतरवण्यास आपल्या अस्तित्वाची जाणिव करून दिली ती इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोराईगड लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला....
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे मावळ प्रांतातला कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव या कोरी लोकांचा गड तो “कोरीगड” हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या किल्ल्याला ओळखला जातो तो “

कोरीगड/कोराईगड”...🚩
किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी :
किल्ल्यावर लांबलचक पसरलेली तटबंदी पाहिल्यावर आपल्याला पहिला प्रश्न पडतो की हे बांधण्यासाठी एवढे दगड आणले कुठुन किल्ला बांधण्यासाठी दगड किल्ल्यातूनच काढले जातात नंतर त्या दगडांच्या खाणीचे रुपांतर पाण्याच्या टाक्यात तलावात केले जाते अशा प्रकारे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होतात...
जसजसे स्थापत्यात प्रगती होत गेली तसतसे त्यानंतरच्या काळात तटबंदीच्या बांधणीसाठी विटा, घडीव दगड यांचा वापर सुरू झाला...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : मेहुल मालपाणी...👌🏼♥️

 

No comments:

Post a Comment