Followers

Friday 5 March 2021

#विश्रामगड #पट्टाकिल्ला.

 






#विश्रामगड
#पट्टाकिल्ला
या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात (इ.स. १३४७-इ.स. १४९०) झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला. समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात शिरण्याअगोदर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर अवशेषरूपी प्रवेशद्वारातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर शिरल्यावर एक उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर एक मीटर उंचीची हनुमान मूर्ती आहे. या मूर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मित, १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील एवढी घळ आहे. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी करून बंद केला आहे. तटबंदी चांगल्या स्थितीत आहे.
तटबंदीच्या पुढे गेल्यावर एक महाकाय दरड कोसळलेली दिसते. येथून पुढे जाता येत नाही. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून सरपटत जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने पाय घसरण्याची भीती असते. गड फिरण्यास फारसा वेळ लागत नाही. हा गड ताम्हिणी घाटावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. कोकणाचे विहंगम दृश्य येथून दिसते. माणगावकडून गाडीमार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव लागते. तिथूनच याची चढण सुरू होते. फारसा प्रसिद्ध नसलेला कुर्डुगड पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजीराजांचे सरदार होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत. म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात

No comments:

Post a Comment