Followers

Tuesday 9 March 2021

मार्टेलो टॉवर.... माऱ्याची जागा.

 







मार्टेलो टॉवर.... माऱ्याची जागा.
"मुंबई." अनेक इतिहास आपल्या उराशी बाळगून जगाच्या अर्थकारणाचा कणा असलेले महानगर होय.
पोर्तुगीज, इंग्रज, शिवकाळ, शिवउत्तरकाळ, पहिले भारतीय स्वातंत्र्यसमर, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र लढा एक ना अनेक घटनांची ही मायानगरी साक्षीदार आहे. या साऱ्या गोष्टींच्या खाणाखुणा आपणास इथे पदोपदी मिळतील.
इथल्या "असण्याला" इतिहास आहे अन "नसण्याला" सुद्धा इतिहासच आहे. हा इतिहास कधी दिसतो तर कधी उशिरा दिसतो. तसंच हे.
या मुंबई (तत्कालीन बॉम्बे) वर राज्य करायचे असेल तर या भूभागाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पाण्यावर वर्चस्व गाजवावे लागेल. याच कारणासाठी "अँटॉप हिलच्या" पूर्वेस असलेल्या खाडीमुखावरील हा "मार्टेलो टॉवर". शत्रूंच्या जहाजांपासून आपल्या भूभागाचे रक्षण करणारा किल्ल्यासम बुरुज.
१० ते १५ सैनिक बसू शकतील एवढी जागा, दोन-चार तोफा राहू शकतील असा वरचा भाग, तोफेसाठी लागणाऱ्या दारूचा साठा करण्यासाठी तळमजला अशाप्रकारे या वास्तूची एकंदर रचना असते.
बघायला गेलो तर मोठा बुरुजच. पण जणूकाही छोटा किल्ला.
अवश्य पहा.
✍🏼

No comments:

Post a Comment