www.durgbharari.com
UDGIR
FORT मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला
सोलापुर,औसा,परांडा,उदगीर, कंधार यासारखे एकापेक्षा एक बलदंड व भक्कम
भुईकोट पहायला मिळतात. हे सर्व किल्ले आजही सुस्थितीत असुन या किल्ल्यांची
रचना महाराष्ट्रात इतरत्र आढळणाऱ्या भुईकोट किल्यांपेक्षा खुपच वेगळी आहे.
मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून
बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या
भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने त्या अनुषंगानेच येथे
किल्ल्याची रचना केली गेली. येथे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक
सुरक्षा कवच नसल्याने किल्ला लढवय्या बनविण्यासाठी त्याला जाडजुड दुहेरी
अथवा तिहेरी तटबंदी बांधुन संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आले. इतकेच
नव्हे तर किल्ल्याला एकामागे एक अशी दरवाजाची साखळी रचुन आत जाण्याचा
मार्ग दुष्कर केला गेला. हे सर्व पहायचे असेल तर लातुर जिल्ह्यातील उदगीर
शहरात असलेल्या
उदगीर किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. उदगीर किल्ला लातुर शहरापासुन ६८ कि.मी.अंतरावर असून उदगीर हे रेल्वेस्थानक असल्याने ट्रेनने देखील तेथे जाता येते. उदगीर रेल्वे स्थानकापासुन किल्ला फक्त १.५ कि.मी. अंतरावर असून तेथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. उदगीर शहर देखील कधीकाळी तटबंदीच्या आत वसल्याच्या खुणा गावातुन जाताना पहायला मिळतात. किल्ल्याकडे जाताना या नगरदुर्गाचे दोन दरवाजे व चौबारा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चौकातील जुन्या काळातील पाणपोई पहात आपण गावाबाहेर असलेल्या किल्ल्यासमोर पोहोचतो. किल्ल्याची बांधणी परकोट, खंदक व दुहेरी तटबंदीने बंदीस्त किल्ला अशी तीन भागात केलेली असुन किल्ल्याच्या दरवाजासमोरील भागात परकोट उभारलेला आहे. परकोटाचा पुर्वाभिमुख दरवाजा आतील चार वास्तु व एक लहान तलाव वगळता परकोटाची तटबंदी व इतर सर्व वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. परकोटाच्या दरवाजावर कमान व आतील देवडी वगळता कोणतेही कोरीवकाम दिसुन येत नाही. परकोटातील एका वास्तुत खापरी नळ व पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. हि वास्तु बहुदा हमामखाना अथवा पाणी पुरवठा करण्यासाठी असावी. दुसरी वास्तु खंदकाच्या काठावर बांधलेली असुन त्यातुन खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याचा दरवाजासमोरील हा भाग जमिनीपासून वेगळा करण्यासाठी २० फुट रुंद व २५ फुट खोल खंदक खोदण्यात आलेला आहे. हा खंदक दोन्ही बाजुंनी दगडांनी बांधून काढलेला आहे. पुर्वी या खंदकावर काढता-घालता येणारा लाकडी पुल असे आता मात्र यावर कायम www.durgbharari.com
No comments:
Post a Comment