शिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..
शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय.म्हणून हे किल्ले अजून टिकून आहे.
महाराजांनी पहिला किल्ला बांधला तो ”राजगड” गडाच्या चिलखती बुरुजावर
दुहेरी तटबंदी असणारा हा जगातील एकमेव किल्ला आहे. जगातील सर्व उत्कृष्ट
किल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन १९८० मध्ये पोर्तुगालची राजधानी लिस्बन
येथे भरले होते.त्यामध्ये राजगड ला विशेष पुरस्कार दिला होता
Chhatrapati Shivaji Maharaj one Geologist teacher
महाराजांनी बांधलेला पहिला गड राजगड
महाराजांनी बांधलेले दुसरा गड प्रतापगड
महाराजांनी दुसरा किल्ला बांधला तो म्हणजे बेलाग, बिकट आणि दुर्गम असा ‘ प्रतापगड” या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी गडाचा महादरवाजा अगदी लांब म्हणजे डोंगरमाथ्यापासून २/३ कि. मी. लांबीवर बांधला प्रतापगड पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत साधारणपणे ७५ ते ८० पायच्या आहेत त्या एकसमान नसून उंचसखल आहेत. याचे कारण की, दोन किलो वजनाची तलवार अन् तेवढ्याच वजनाची ढाल घेऊन पाय-यावरुन चढताना शत्रूची दमछाक व्हावी. तसेच चालून दम लागल्यामुळे ”Dehydration’ भरपूर होते अशात गडाच्या गोमुखी दरवजापासून मुख्य हत्तीदरवाजापर्यंत असणा-या ”भूलभुलैया” सारख्या रचनेमुळे शत्रूला वाट शोधण्यात अडचण यावी, तो गोंधळून जावा. अशात त्यावर सहज विजय मिळवता येतो. हे तंत्र त्यांनी वापरले.
शत्रूपासून किल्ला सुरक्षित रहावा म्हणून महाराजांनी किल्ल्यापासून २०० मीटर अंतरावर समुद्रात सुमारे पाऊण कि. मी. लांबीची व तीन मीटर रुंदीची भिंत इंग्रजी एल आकारात अशा पद्धतीने बांधली की, चंद्राच्या कलांचा अभ्यास करुन त्यांनी ती भिंत ओहोटीच्या वेळेसही वर दिसणार नाही अशी व्यवस्था केली. त्यावेळच्या इंग्रज, पोर्तुगीज, डच यासारख्या समुद्री शत्रूची पादत्राणे कच्च्या चमड्याची असत. याचा अभ्यास करुन महाराजांनी समुद्रातील किल्ल्याच्या बेटाभोवती ओबडधोबड दगड, चीरे अशा रीतीने बेमालूम पेरले की, ते भरतीच्या वेळेसही दिसावेत. त्यावर अणकुचीदार शंखशिंपले यांची वाढ व्हावी. त्यामुळे समुद्राच्या खारवट पाण्यात त्यांच्या चपला भिजल्यास त्यांना अशा दगडी चियांवरुन चालताही व लढताही येऊ नये ही व्यवस्था त्यांनी केली.
कुलाबा किल्ला बांधणीत तर त्यांनी फक्त दगडी चीरे एकमेकावर ठेवले. त्यात सिमेंट वापरले नाही. तरी ३५० वर्षानंतरही त्याचा एकही चीरा समुद्राच्या लाटेने इकडेतिकडे सरकला नाही.
छत्रपती शिवबांनी सातारा जिल्ह्यात प्रतापगडच्या पायथ्याला पारगाव पासून १ कि.मि. अंतरावर १६६१ मध्ये कोयना नदीवर पुराच्या काळात पुराच्या पाण्याचा अभ्यास करुन ”८ मीटर रुंद, १५ मीटर उंच व ५२ मीटर लांब पूल बांधला’ या दगडी कमानी पुलाच्या बांधकामात त्यांनी चुन्याबरोबर असे काही घटक वापरले आहेत की, ज्यामुळे त्या बांधकामावर कोणतीही वनस्पती उगवणार नाही. तो पुलचा फोटो viral झालेला
सिंधुदुर्ग बांधताना असा उल्लेख आहे
सिंधुदुर्ग किल्ला बांधताना महाराज लिहले, ”बांधकामाला समुद्राकाठची वाळू वापरत आहात हाती गोड्या पाण्याचा भरपूर साठा ठेवा, ही खारवट वाळू गोड्या पाण्यात दोन चार दिवस भिजवून ठेवा. तिचे खारवटपण निघून जाऊद्या. मगच ती बांधकामात वापरा.” म्हणजेच समुद्राच्या वाळूचेही विभागीकरण कसे करावे हे ज्ञानही महाराजांना होते. कोकणात प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. जांभा खडक हा ठिसूळ खडक. त्यासाठी समुद्रातील किल्ल्यांची पायाभरणी करताना, सिंधुदुर्गावर ५ खंडी शिसे ओतले. (१ खंडी = १६०० कि.). किल्ल्याचे बांधकाम नोव्हेंबर १६६४ ते मार्च १६६७ पर्यंत चालू होते. किल्ला चार कि. मी. च्या तटबंदीत, वीस हेक्टर क्षेत्रफळात बांधला गेला. या किल्ल्यासाठी महाराजांनी १ कोटी होन जो सुरतेच्या स्वारीतून मिळाला, तो पैसा वापरला. (एक होन = साडेतीन रुपये) ऐन युद्धात सैन्याची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक किल्ल्यांच्या बुरुजावरती शौचकूप (संडास मुतारी) बांधणारा लोककल्याणकारी, अगदी बारीक गोष्टींचा विचार करणारा राजा आम्हाला काळजाच्या आत जपून ठेवावा लागेल. महाराजांनी सिंधुदुर्गच्या तटबंदीत ४० शौचकूप बांधली व ४२ बुरुज बांधले.
आज्ञापत्रामध्ये रामचंद्र अमात्य (जे शिवाजी महाराज यांच्या हाताखाली तयार झाले आणि संभाजी महाराज आणि राजाराम महाराज त्यांच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहीले, जययानी राज्यामध्ये राजाराम महाराज नसताना हुकूमतपन्हा ही पदवी घेऊन स्वराज्याची सेवा केली) त्यांनी आज्ञापत्र नावाचे ग्रंथ लिहले त्यात राज्य कसे करावे अशी शिवाजी राजांची संकल्पना मांडली.पुढे शाहू महाराज आणि पेशवे यांनी त्याचे पालन केले.त्यामध्ये किल्ला कसा बांधवा असे उत्तम लिखाण केले आहे.
१) राज्य रक्षणाचे कारण किल्ले, देशो देशाचे डोंगर पाहून किल्ल्याची जागा ठरवावी.किल्ल्याशेजारी दुसरा पर्वत किंवा डोंगर असता काम नये.जरी असला तरी सुरंग लावून गडाच्या आहारी आणावा.
गड बांधण्याअगोदर पाणी आहे का ते पाहावे.पाणी नसेल तर दगड खोदून पाणी शोधावे .दोन तीन टाकी पाण्याची बंधने .झऱ्यावर विश्वास ठेवू नये.
२) तट बुरुज चिलखत पहारे जेथे जेथे आहे तिथे मजबूत करावे
३) नाजूक जागा आहे तिथे मजबूत तट बंधी द्यावी
४) खालील मारा चुकवत येईल असे दरवाजे बांधावे,पुढे बुरुज देऊन, काही बुरुजांच्या आड दरवाजा लपेल असा बांधवा
५) किल्ल्याला महादरवाजा एकाच ठेवावा , किल्ल्याचा ऐसपैस पाहून दोन किंवा तीन दरवाजे तसेच दिंडी दरवाजा ठेवावा.
६) गडावर मामलेदार गौडे आदी करून ठेवावे.
७) गडावर यायलामार्ग सुगम(सोपा) नसावा, जरी सोपा असला तरी झाडी किंवा दगड घालून अवघड करावा.
८) कित्येक दरवाजाला आणि तटबंदीला लगेच मैदान लागते ते भुईकोट किल्ला बरे नव्हे.जर तसे असले तरी आणखी एक खंदक बांधव आणि त्यापुढे आणखी दुसरी तटबंदी बांधावी.
९) गडावर खूप जास्त झाडी वाढवावी.विशेषतः कामराग्याची झाडी .त्यातील एकही झाड तोडू न देणे.
१०) सामान नेहमी दिंडीदारवाज कने आन करावी .चोर दरवाजा असला तरी वापरू नये.काही काळासाठी दगड टाकून बंद करावा.
११) धान्याची कोठारे बँडण्या अगोदर उंदीर घुसले यांचा बंदोबस्त करावा.दगड गच्च बांधावे की अश्या प्राण्यांनी घरे करू नये.पन्हाळ्यावर गंगा, यमुना, सरस्वती या धान्यकोठारात सर्व मिळून २५,००० खंडी धान्य मावते. (१ खंडी=१६०० किलो).
ज्या किल्ल्यास काळे दगड गराजेवीरहित असेल त्या वेळी तेलास आणि तुपास टाकी करावी.
१२) दारुखना (स्फोटक आणि हत्यारे चे ठिकाण) घराजवळ किंवा घरवच्या तळघरास ठेवू नये.दारुखना वस्तीपासून लांब ठेवावा. २४ तास पहारे ठेवावे. दार आठ दिवसांनी अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करावी.भोपाळ वायू गळती, जपान अणुभट्टी स्फोट यासारख्या घटना बघताच महाराजांचा दूरदृष्टीचा अंदाज येतो.
किल्ले बांधताना शिसे चा वापर प्रामुख्याने होत असे .
सिंधुदुर्ग बांधताना किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला.सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
चौऱ्यााऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।
१) आज्ञापत्रे रामचंद्रपंत अमात्य
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

No comments:
Post a Comment