#उस्मानाबाद_शहरातील_परिचित_व
#अपरिचित_मुर्ती
उस्मानाबाद हे प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेले गाव असल्याने गावाचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वी पासून सांगता येतो.
शहरातील वैराग नाका येथे असणारी पांढरी हि सातवाहन कालीन वसाहत असून चमार लेणी, लाचुंदा लेणी व धाराशिव जैन लेणी यांच्या मध्ये हे गाव वसलेले आहे या ठिकाणी आज ही मनी , खापरे, विटा पुष्कळ मिळतात.
सातवाहन ते राष्ट्रकूट, चालुक्य, कलचुरी, यादव, तुघलक, बहमनी, आदिलशाही, मुघल, निझाम, मराठा इ. राजवटी पाहिलेले हे गाव असल्याने इथे वेगवेगळ्या काळात लेणी, मंदिरे,मस्जिद, दर्गा इ. वास्तू स्थापन झालेल्या दिसून येतात.
इथे आपण जुन्या कासब्यातील म्हणजे कसबे धाराशिव असणाऱ्या जुन्या गावातील अपरिचित अशा मुर्ती बद्दल जाणून घेणार आहोत म्हणजे त्या सध्या गावातील कोणत्या भागात आहेत व त्यांची काय नावे आहेत.
प्रथम आपण ग्रामदेवी श्री. धाराशिवमर्दिनी बद्दल माहिती घेऊ, हि मुर्ती पाषाण मुर्ती असून स्मित हास्य भाव असणारी शिल्पित केली आहे, मुर्ती अष्टभुजा असून वाहन सिंह आहे. सध्या देवीवर वज्रलेप दिला आहे. याच मंदिर परिसरात पंचमुखी हनुमान, श्री. मातंगी देवी, मल्हारी मार्तंड इ. देवांच्या मुर्ती आहेत.
ग्रामदैवत श्री कपालेश्वर महादेवाचं खूप मोठं व प्राचीन मंदिर पूर्वी गावात होतं याची साक्ष इथे असणाऱ्या लिंग, मंदिराचे स्तंभ, येथील मुर्ती यावरून कळून येते यामंदिरात द्वारपाल, वीरगळ, भैरव,पार्श्वनाथ मूर्ती, नंदी, नागशिल्प, विष्णू, गणपती, येथील काही मुर्ती ह्या गावातील गोसावी मठ येथे ठेवलेल्या आहेत यात प्राचीन असा सर्पयज्ञपोवित घातलेला गणेश, दुर्मिळ अशी समपाद अवस्थेमधील सरस्वती मुर्ती आहे. येथे असणाऱ्या गढीमधील भिंतीमध्ये एक वीरगळ आहे. ( हे लढाई दर्शक असून, कपालेश्वर मंदिरातील हिंस्रप्राण्यापासून गावावर आलेले संकट याचे दर्शक आहे ) काही सतीशिळा हि भेटतात एक पापनाश येथे तर दुसरी नागनाथ मंदिराजवळ याच मंदिरात शिवलिंग, गणपती मुर्ती, वीरगळ, ( तर एक सतीशीळा राजे बाग येथे आहे )साधक मुर्ती पाहिला मिळतात तर एक दुर्मिळ कपाली गाय वासरू शिल्प पण इथे आहे. ( वासरू गायी पिताना ).
घाण्याचा म्हसोबा बऱ्याच ठिकाणी आहे, एक देशपांडे स्टँड, दुसरा राजे बाग मंदिर , एक चमार लेणी मागे, तर एक bsnl ऑफिस च्या जवळ आहे.
काझी गल्ली येथील सुतार वाड्यात एक सुंदर अशी गजलक्ष्मी मुर्ती असून बाजूला वीरगळ आहे. तर येथील ब्राह्माण गल्ली मध्ये राम मंदिर असून कसब्यात मोठे श्री राम मंदिर आहे येथील राम लक्ष्मण सीता यांच्या सुंदर अशा मुर्ती पाहण्यासारख्या आहेत माउली चौक येथील पांडुरंग दरबार मध्ये संगमरवरी अशा विठ्ठल रुक्मिणी मुर्ती आहेत येथून जवळच असलेल्या सांजा वेस येथील मारुती व याच मंदिरात पुर्वी एक सतीशिळा होती पण ती कोणी तरी नदीमध्ये फेकुन दिली आहे. याच मंदिराच्या मागे छोटेचे शिवमंदिर आहेत तर जीजमाता उद्यान जवळून जाणाऱ्या नदी मध्ये सप्तमातृका आहेत.
तर हनुमानाचे पार जुनी गल्ली, जिजामाता उद्यान, ( या मंदिरात हि काही वीरगळ पाहिला मिळतात ), इंगळे गल्ली, भीमनगर, सांजावेस, काळामारुती इथे आहेत.
तर माउली चौक येथे जैन धर्मियांचे मंदिर आहे. त्याच बाजुला पावणारा गणपती आहे.
तर बस डेपो येथे असणारा गणपती व त्या मंदिराला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
तर कसबा स्कुल जवळ जुना गणपती आहे. तर कोळपेच्या घरा समोर शिवपार्वती व गणेश मूर्ती आज ही पुजल्या जातात.
तर एक गरुड मुर्ती भीमनगर येथील हनुमान मंदिराजवळ आहे इथेच लक्ष्मी आई ची पूजा दरवर्षी होत असते.
तर ताज टॉकीज बाजूला यमाई मंदिर व शनी मंदिर आहे.
तर हातलादेवी मंदिरात दुर्गा असून मंदिर परिसरात नाग शिल्प आहे. चमार लेणी येथे शिवलिंग व गणेश शिल्प आहे तर पाठीमागे दुलदुल घोडा याचे शिल्प आहे. तर पापनाश येथे शेषशाही विष्णू, त्रिविक्रम ( वामन अवतार ), गणपती, वीरगळ, शिवलिंग, घाण्याचा म्हसोबा इ मुर्ती पहावयास मिळतात.
धाराशिव लेण्यात पार्श्वनाथ, श्रीकृष्ण पट्ट, इ. मुर्ती असून बोंबले हनुमान व बाजूला चक्रतीर्थ येथे वीरगळ, विष्णू मुर्ती व शिवलिंग आहे.
अशा शेकडो मुर्तीतून आपला धार्मिक वारसा शेकडो वर्षांपासून जतन झालेला पाहिला मिळतो काही मुर्ती मंदिरात व सुस्थितीमध्ये आहेत तर काही ऊन, वारा पाऊस याचा मारा सहन करत आज ही उभ्या आहेत.
आपल्याला या मुर्ती मुळे इथे असणारे पंथ, देव, धार्मिक रूढी इ. आकलन होते.
© जयराज खोचरे
अध्यक्ष
इतिहास व पुरातत्व परिषद, उस्मानाबाद जिल्हा.
अध्यक्ष
इतिहास व पुरातत्व परिषद, उस्मानाबाद जिल्हा.
No comments:
Post a Comment