Followers

Saturday, 25 April 2020

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १
गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे... महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे प्रणेते शिव छत्रपती यांच्या कर्तुत्वाने व नेतृत्वाने हि भूमी पावन झाली आहे. देशाला महान व जाज्वल्य अशा इतिहासाची अमुल्य देणगी महाराष्ट्राच्या मातीने दिली.मराठमोळ्या माणसाला गर्व वाटावा अशा इतिहासाच्या पराक्रमाने रक्ताचा थेंबन थेंब हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी पुलकित झाला. या इतिहासाच्या पाऊलखुणा व छत्रपती शिवरायांचे क्रांतिकारी विचार आजच्या तरुणांना दीपस्तंभांसारखे आहेत. याच इतिहासाचे साक्षीदार म्हणजे महाराजांनी घडवलेले गडकोट जे आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी उभे आहेत. आणि हे गडकोट म्हणजे महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची संपत्ती या दीपस्तंभाच्या प्रकाशात व गाड्कील्ल्याच्या पराक्रमी विचारांना साद घालण्यासाठी गडकोट संवर्धनाचा छोटासा प्रयत्न. ढासळले बुरुज तटाला खिंडारे पडली ना राहिल्या तोफा ना शिबंदी उरली हल्ले होत नाहीत आता ना नगारा दुमदुमतो पडझडलेल्या भिंतींमधून वारा फक्त वाहतो फत्तराच्या काळजातला एक एक चिरा निखळून पडतोय राजा तुझ्या आठवांनी उर भरून येतोय सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे तुझ्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे उभाच राहीन मी सांगेन गाथा तुझ्या पराक्रमाची आठवण सदा करून देईन इतिहासाची.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

No comments:

Post a Comment