Followers

Friday, 10 April 2020

*माळेगांव संस्थानचे, आद्य संस्थापक अधिपती श्रीमंत राजे शंभूसिंह धनाजीराव जाधवराव (व्दितीय ) माळेगावकर

*माळेगांव संस्थानचे, आद्य संस्थापक अधिपती श्रीमंत राजे शंभूसिंह धनाजीराव जाधवराव (व्दितीय ) माळेगावकर
सरसेनापती धनाजी जाधवास दोन पत्नी होत्या पहीलीस सरसेनापती सुजनसिंह उर्फ संताजीराव तर दुसरीस सरसेनापती चंद्रसेन व श्रीमंत शंभूसिंग होते. संताजी हे कालांतराने वडीलोपार्जीत वतनी मांडवे बोरगाव पाडळी वतनी होते . संताजी स्वभावाने तामसा असून तो स्वतंञ्य राहू इच्छित होता . धनाजीच्या मृत्यूनंतर छञपती शाहू महाराज यांनी हिच व्यवस्था कायम राखली व चंद्रसेनास सेनापतीची वस्ञे दिली. शंभुसिंग आपल्या हाताखाली मुतालिक म्हणून नेमले.
सरसेनापती चंद्रसेन जाधवराव यास कोणत्याही उपायाने आपल्यास मिळवून द्यावी अशी शाहूची मोठी इच्छा होती, पण तो शञूकडे गेलाच बरोबर शंभूसिंग व काही कारकूर नेले होते. ते कारकून छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना आपल्याकडे वळवून घेतले आणि त्यांना काही नवीन सरंमजान करून दिले.
सरसेनापती चंद्रसेन जाधवरावाचे सरसेनापती सरसेनापतीपद काढून घेतले ते काही दिवस संताजीस दिले व दोन वर्षात त्याच काढून पुन्हा का घेतले हे समजत नाही चंद्रसेन चा भाऊ शंभुसिंग बरोबर निघून गेला परत त्याला आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचा प्रयत्न त्यात परत आणण्यासाठी चालू होता चंद्रसेन आणि शंभुसिंग बरेच वर्षे एका विचाराने राहत होते परंतु या दोघांमध्ये वितुष्ट येऊन चंद्रसेन आपणास कैद करणार असे वर्तमान समजल्यावर शंभुसिंग पळून शाहू राजांकडे आला त्यावेळी शाहू महाराज यांनी लिहिलेली पत्रे 14 ऑक्टोंबर 1729, 5 जानेवारी 1730 छत्रपती शाहू महाराज रोजनिशी यात आहेत.
शाहू महाराजांनी छञपती संभाजीवर पन्हाळ्याकडे स्वारी पाठविली हे तिथे शंभूसिंगानी फार उत्तम प्रकारे मोहीम पार पाडली व चांगलीच मदत केल्याने शाहू महाराजांची त्याच्यावर फार मर्जी झाली .
पुढे 1731 साली प्रसिद्ध तह छञपती संभाजीची व छञपती शाहूची भेटून वारणेचा तह झाला.
त्या भेटीत शंभूसिंगाचे फार महत्त्वाची कामगिरी होती . दोन्ही राजबंधू छञपती शाहू व छञपती संभाजींच्या मागे हत्तीवर खावासखान्यात बसला होता.
इथेच समजते की शंभूसिंग यांचे वारणेच्या तहात फार महत्त्वाची कामगिरी होती. दोन्ही राजबंधूंच्या पाठिमागे शंभूसिंगास बसवले होते यावरून शंभूसिंगावरील शाहूंनी ठेवलेला स्वराज्यप्रती विश्वास दिसून येतो.
जंजिऱ्याचे सिद्दी वर प्रतिनिधी पाठवले त्याचबरोबर शंभुसिंगास पाठवले तिथे ही शंभूसिंगाने उत्तम पराक्रम केला.1732 नोव्हेंबर रोजी शाहूने शंभुसिंगास माळेगावची वतनाची सनद करून दिली हा गाव यांच्या घराण्याकडे चालत आहे.
1739 च्या कर्नाटक स्वारीत फत्तेसिंग भोसले बरोबर शंभुसिंग होते या स्वारीत चंद्रसेन विरुद्ध पक्षाबरोबर होते.
शंभूसिंग 1760 मध्ये वारले.
पश्चात त्याचा पुत्र श्रीमंत अमरसिंह उर्फ बाबासाहेब यांनी माळेगाव येथे समाधी उभारली

No comments:

Post a Comment