दुर्ग पन्हाळा तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच अनेकांनी या गडाच्या अक्षरशः वाऱ्या केल्या आहेत. तसे पाहायला गेलं तर पन्हाळ्यावरची अनेक ठिकाण, वास्तू आपल्याला तोंड पाठ आहेत तिकडे हमखास सर्वांची पावले ही वळतातच पण याच गडावरच अशी काही ठिकाण देखील आहेत जिकडे सहसा माहिती अभावी म्हणा किंवा वेळे अभावी म्हणा जाणे काहीजणांना होतच नाही. तर असच एक ठिकाण आहे ते म्हणजे किल्ले पन्हाळा गडावरील ही अष्ट कोणी विहीर ( पाण्याचा जलस्रोत )
किल्ले पन्हाळा गडावर छत्रपती संभाजीराजे दुसरे ( करवीर पाहिले ) यांचे मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कूट आहे तर सोमेश्वर तलाव पासून जवळच असणाऱ्या हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधी समोरील भागात तर या मंदिराच्या मागील बाजूसच तट बंदिस्त आशा स्वरूपात आहे ही अष्टकोनी विहीर. मंदिराच्या डाव्या बाजूने चालत आपण पुढे गेलो की एका कोपऱ्यात दगडी तटबंदी सारखे छोटे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते थोडेसे वळण घेऊन आपण पुढे गेलो की मग आपल्या नजरेस पडते ती ही सुंदर अशी विहीर ( बाव ) तिन्ही बाजूनी दगडी छावणीच उभारली असल्यामुळे जवळ गेल्याशिवाय या विहिरीचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तिथून खाली विहरित उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या उतरून आपण सरळ पोहोचतो ते या अष्टकोनी विहिरी जवळ (बावीजवळ ). या विहिरीचे मुख दगडात कलाकुसर काम करून अष्ट कोणी स्वरूपात बनवले आहे. यातील पाणी सुद्धा थंडगार , नितळ आणि पिण्यायोग्य असे सुंदर आहे. विहिरीच्या वरच्या भागात आणि बाजूने दगडी बंदिस्त स्वरूपातील बांधकाम असल्यामुळे या ठिकाणी पाण्यात कोणतीही घाण अथवा धूळ पडण्याची शक्यता खूप कमीच. विहिरीच्या बाहेरच्या भागात एक जुने दगडी भांडे देखील आपल्याला पाहायला मिळतेच. आमच्या शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या स्वच्छता मोहीमा , भटकंती या निमित्ताने आजवर अनेक वेळा किल्ले पन्हाळा गडाची सफर ही ठरलेली आहेच मग सोबत असलेले मित्र मंडळींना घ्यायचं आणि ह्या आशा थोडे आड ठिकाणी दडलेल्या ठेव्याकड घेऊन जायचं हे ठरलेलं आहेच. बऱ्याच जणांना ह्या विहिरीविषयी माहिती नसावी कदाचित पण अतिशय सुंदर व थोडा वेगळा असा विहिरीचा हा ठेवा नक्की आवर्जून सर्वांनी पहावा असाच आहे.
सातप्पा स. कडव
#शिवशक्ती_प्रतिष्ठान #सह्याद्रीच्या_वाटेवर
#अष्टकोणी_विहीर_बाव #किल्ले_पन्हाळा #गडावरचे_जलस्रोत #भटकंती #जिल्हा_कोल्हापूर #माझा_महाराष्ट्र #शिवछत्रपतींच्या_मुलुखात
No comments:
Post a Comment