किल्ले कंडाणा किंवा कंडाळ्या हा समुद्र सपाटीपासून ११३० मीटर उंचीचा गिरीदुर्ग नाशिक मधील पिंपळा गावाजवळ आहे, म्हणून त्यास पिंपळागड असेही म्हणता. किल्यास जाण्यासाठी दोन मार्ग असून पहिला म्हणजे नाशिक - दिंडोरी - वणी - नांदुरी - अभोणा - कनाशी - चिंचपाडा व तेथून गडपायथ्याचे मळेगाव आणि दुसरा म्हणजे नाशिक - कळवण मोक भणगी पिंपळा - चिंचपाडा व मळेगाव असा आहे. सोईचा मार्ग निवडून चिंचपाडामार्गे मळेगाव गाठायचे.
कंडाणा किल्ल्याला नेढे असून हे जवळजवळ ७० फूट व्यासाचे मोठे नेढे काबिलेतारीफ असेच आहे. काळ्या कुळकुळीत डोंगराला पडलेले हे आरपार भोक, त्यातून इकडे तिकडे वाहणारा भन्नाट वारा व नेढ्यात ५०-६० लोक आरामात बसू शकतील अशी निवांत सपाटीची जागा आहे. ह्या नेढ्याच्या पलिकडेच डाव्या हातास एक नैसर्गिक गुहा असून तेथे जाण्यासाठी खडकात खोदलेला पायऱ्यांचा मार्ग आहे. ह्या गुहेस लागूनच पाण्याची तीन कातळकोरीव टाकी असून सध्या मात्र ही खराब झाली आहेत. आपण ही टाकी व गुहा पाहून परत नेढ्यात यायचे. पुढे ह्या नेढ्यातून उजव्या हातास जाणारा मार्ग कंडाणा गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातो. माथ्यावर तीन कोरडी टाकी आहेत. या गडाचा वापर टेहळणीसाठी करत असावेत.
येथून डोलबारी रांगेचे दृश्य छान दिसते. टकास सुळका, साल्हेर व सालोटा तसेच हारगड, मुल्हेर व मोरा गड दिसतात.
किल्ले कंडाणा, ता. कळवण, जि. नाशिक
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
किल्ले कंडाणा, ता. कळवण, जि. नाशिक
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment