गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १२
*किल्ले श्री. घोसाळगड उर्फ वीरगड*
नाव किल्ले पूर्णगड
उंची २६० मीटर
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रायगड , महाराष्ट्र
जवळचे गाव रायगड ,रोहे,मुरुड
डोंगररांग.
घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.
*इतिहास*
शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पुर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्याच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षीत आहे.
गडदर्शन करून आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.
*पाहण्यासारखे*
पायऱ्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करून चढाई सुरुकरायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येवून पोहोचतो.
कातळात कोरलेल्या पायऱ्या समोर दिसतात. यातील काही पायऱ्या तोफांच्या मार्यामुळे ध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला दरवाजा पर्यंत घेऊन जातात. मात्र येथिल प्रवेशव्दार पुर्णत: नष्ट झालेलेआहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.
येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माचीपाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.
गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║

No comments:
Post a Comment