बेलूर आणि हळेबिडू दर्शन!
- मयूर पुराणिक ©
'हंपी' सिनेमात एक संवाद आहे - पैसे कमवायचे असतील तर मुंबईला जा, पाय असतील तर हंपी फिरा आणि डोळे (दृष्टी) असेल तर बेलूर बघा.
खरोखर! ह्या तीन दिवसात अशक्यप्राय वाटणाऱ्या मानवनिर्मित अनेक कलाकृतींपुढे नतमस्तक झालो. डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही अश्या गोष्टी समोर बघत होतो.
मानवाच्या अपार कौशल्याचे, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, अविरत मेहनतीचे आणि आपल्या धर्मावर-देवावर-राजावर असलेल्या अपरंपार श्रद्धेचे दर्शन आपल्याला बेलूर आणि हळेबिडूच्या मंदिरांमध्ये घडते.
बेलूरचे चेन्नकेशवा मंदिर, हळेबिडूची होयसलेश्वरा, केदारेश्वरा आणि इतर मंदिरं म्हणजे शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना असावेत.
मंदिरांच्या आतून आणि बाहेरून रामायण, महाभारत आणि पुराणातले असंख्य प्रसंग कोरले आहेत.
प्रत्येक शिल्प म्हणजे बारकाव्यांसकट सांगितलेली एक कहाणी आहे. आपण स्वतः जाऊन ती बघावी, अनुभवावी.
होयसला स्थापत्यशैलीत बनवलेले चेन्नकेशवा मंदिर बांधायला १०३ वर्ष लागली तर होयसलेश्वरा मंदिर बांधायला तब्बल १९० वर्ष लागली.
म्हणूनच तर मंदिरात शेकडो हत्ती कोरले असूनही एकही हत्ती दुसऱ्यासारखा नाही. ५० खांब असले तरी प्रत्येकाचा आकार आणि त्यावरील नक्षी वेगवेगळी.
हे सगळे आणि छतावर केलेले नक्षीकाम बघता आपल्याला प्रश्न पडतो कि आजच्या उन्नत काळातही हे सगळे अवघड वाटणारे काम त्यांनी 'छिन्नी-हातोडी' सारख्या मूलभूत अवजारांनी कसेकाय केले असेल!
होयसला साम्राज्याने चालुक्य, चोला इत्यादी साम्राज्यांना हरवून कर्नाटकावर ३०० वर्षाहून अधिक काळ शासन केले.
त्यांची पहिली राजधानी होती सोसावूर(आजचे अंगडी) नंतर बनली वेलापुरा(आजचे बेलूर). पुढे साम्राज्यविस्तारानंतर द्वारसमुद्र(आजचे हळेबिडू) होयसलांची राजधानी बनली.
ह्या काळात त्यांनी एकाहून एक सुरेख अशी सुमारे १५०० मंदिरं बांधली. त्याकाळी मंदिरं हि धर्म, संस्कृती, साहित्य, संगीत, कला, विज्ञान अशा ज्ञानवर्धक विषयांची विद्यापीठे होती.
परंतु हि मंदिरंसुद्धा इतर मंदिरांप्रमाणे परकीय आक्रमकांपासून वाचू शकली नाहीत. त्यांना फोडून-जाळून विद्रुप करण्यात आले. संपूर्ण द्वारसमुद्र शहराला नष्ट करण्यात आले, म्हणूनच ह्याला नाव पडले हळेबिडू (कन्नडमध्ये हळेबिडूचा अर्थ होतो 'उध्वस्त शहर'). शिवाय बऱ्याच मुर्त्या ब्रिटिशांच्या काळात चोरून नेल्या गेल्या.
सध्या १५०० पैकी अंदाजे ४० मंदिरंच भग्नावस्थेत शिल्लक आहेत जी आज आपल्याला अप्रतिम वाटतात तर ८०० वर्षांपूर्वी ह्या मंदिरांचे वैभव केवळ शब्दातीत असावे.
आजची विज्ञाननिष्ठ मंडळीही ह्या मंदिरांवरची शिल्प पाहून अवाक होतील जेव्हा त्यांना दिसेल कि १२व्या शतकातही आपल्याकडे दुर्बीण होती, स्वतःच्या आसाभोवती फिरणारा नक्षीदार खांब होता, क्षेपणास्त्रे/अग्निबाण होते आणि अंतराळवीरही होते. सच्च्या जिज्ञासूंनी स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी.
ह्या मंदिरांच्या रूपाने आपल्याला जो अर्धा-अपूर्ण वारसा मिळाला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जसाच्यातसा पोहचवण्याचं महत्वाचं काम आपण करूया. येणाऱ्या पिढयांची भारतीय संस्कृतीशी 'नाळ' आजपासूनच जोडूया.
***** धर्मो रक्षति रक्षित: *****

No comments:
Post a Comment