Followers

Wednesday, 29 April 2020

विशाळगड























विशाळगड
विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच,पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून, ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.
गडकोट संवर्धन व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी नक्की परिवारात सामील व्हा...
https://www.facebook.com/groups/448674915945253/
!!जय शंभुराजे परीवार महाराष्ट्र राज्य!!

Sunday, 26 April 2020

महाराजांचे जलदुर्ग बांधणीतील अभिनव प्रयोग.





महाराजांचे जलदुर्ग बांधणीतील अभिनव प्रयोग. नमस्कार मित्रांनो,
सर्व प्रथम आपणा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो! कारण मागील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया वाचून खरंच भारावून गेलो. काही प्रतिक्रिया तर अंगावर शहारे यावेत इतक्या विस्मयकारक होत्या. आपल्या अनमोल प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांच्या ऋणात राहणेच मी पसंद करेन.
मित्रांनो तुमच्या प्रतिक्रियांमधून मला माझ्या लिखाणाची पावती तर मिळतेच त्याच बरोबर मनात एक आत्मविश्वास तयार होतो जो मला इतिहासाच्या नवनवीन वाटा शोधण्यास प्रवृत्त करतो. ही पावतीच मला वाटते मला तुमच्याशी जोडून ठेवते. त्यामुळे तुमच्या सर्व प्रतिक्रियांचे अगदी हृदयाच्या अंत:करणातून स्वागत आहे.

मागील लेखात आपण महाराजांनी डोंगरी किल्ल्यांवर केलेले काही अभिनव प्रयोग जाणून घेतले.
प्रस्तुत लेखात आपण महाराजांच्या सागरी किल्ले म्हणजे जलदुर्गांच्या बाबतीत केलेल्या अभिनव प्रयोगांबद्दल माहिती घेणार आहोत.
8 फेब्रुवारी 1665 ह्या दिवसाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे कारण याच दिवशी इतिहासाच्या कालपटलावर दोन गोष्टी घडल्या - एक मुंबईसारखे व्यापारी बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून दिले आणि त्याच दिवशी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपति शिवरायांनी आपल्या सागरी मोहिमेसाठी स्वतःच्या आरमारासोबत समुद्रावर पहिले पाऊल ठेवले. हीच ती प्रसिद्ध अशी बसरूर ची पहिली सागरी मोहीम.
इतिहासामध्ये काही घटना अशा असतात की, त्यांना आपण फक्त 'co-incidence' म्हणू शकतो, त्यात खऱ्या अर्थाने इतिहासानेच इतिहासाला दिलेला भविष्यातील इतिहासाचा एक गर्भित इशाराच असतो. महाराजांची पहिली समुद्र सफर आणि पहिली सागरी मोहीम एकाच दिवशी असण्यामागे निश्चितच भविष्यातील मराठ्यांच्या बलदंड आरमाराची मुहूर्तमेढ होती. बऱ्याच वेळा शिवचरित्र वाचतांना मन अचंबित होते. फक्त पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत एखादा माणूस पाठीशी कसलं बळ नसताना स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतो काय आणि एकापेक्षा एक किल्ले जिंकत काही बांधत गडपती होतो काय! ह्या पुण्यभूमीला अंकित करून स्वराज्य उभं करतो आणि ह्या भूमीचा भूपती होतो काय! इथेच न थांबता सागरावर शतकोत्तर अधिराज्य गाजवणाऱ्या पारंपारिक शक्तींना आव्हाने देत स्वतःचे बलदंड आरमार उभं करतो काय आणि जळपती होतो काय! हे सारेच थक्क करणारे आणि महाराजांच्या कर्तुत्वाला बहुरंगी, बहुढंगी आयाम चढवणारे आहे.
महाराजांचे हे कर्तृत्व पटवून देताना एका डग्लस नामक इंग्रज अधिकाऱ्याचे उदगार सांगावेसे वाटतात " शिवाजीमहाराज जन्माने खलाशी नव्हते ईश्वराची कृपा समजली पाहिजे. जर ते खलाशी असते तर जमिनीप्रमाणे सागर सुद्धा त्यांनी शत्रूपासून मुक्त केला असता!".
साधारणत: जावळी हस्तगत केल्यानंतर महाराजांचे लक्ष तळकोकणाकडे वळले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले, कोकण किनारपट्टीवर मोकळ्या ठिकाणी शत्रू मोक्याची ठाणे बळकावून बसला होता. गोवा, वसई, रेवदंडा, मुंबई येथे पोर्तुगीज तर डच कोचीन जवळील काही भागात सत्ता बळकावून बसलेत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1608ला आलेले इंग्रज मच्छलीपट्टण, मद्रास, हरिपूर बालासोर, हुबळी, सुरत, राजापूर इत्यादी बंदरे बळकावून बसले होते. हे कमी की काय राजापूरच्या खाडीत जंजिरेकर क्रूर सिद्दींनी कोकणातील काही भागावर सत्ता टिकवून धरली होती. व्यापारीदृष्ट्या ही बंदरं खूपच महत्त्वपूर्ण होती .स्वराज्यातील किनारी भागांना संरक्षण द्यायचे असेल तर ह्या भागात फक्त दुर्ग उभे करून चालणार नव्हते तर फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार उभे करण्याची गरज होती, हे महराज जाणून होते. कारण त्यावेळी भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते अगदी इस्लामिक पातशहाला सुद्धा मक्केला जाण्यासाठी पोर्तुगीजांच्या परवान्याची गरज लागायची. त्यामुळे पोर्तुगीजांचा असा समज झाला होता कि सागरावर आमचीच मालकी आहे.आमच्या परवानगी शिवाय कुणीही समुद्रात पाय सुद्धा ठेऊ शकत नाही. हेच त्या दूरदर्शी राजाच्या मनाला टोचत होते. म्हणूनच महाराजांची स्वराज्याचा डाव विस्तारायचा ठरवला.यांत त्यांनी प्रथम कल्याण, भिवंडी, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, अंजनवेल, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, ही महत्वाची बंदरे ताब्यात घेऊन तिथे जहाज बांधणीचे कारखाने खोलले.
बघता बघता हा उदयॊग इतका वाढला कि सुरुवातीला दुर्लक्ष करणा-या परकीय सत्ताधीशांनी मराठ्यांचे आरमार पाहून अक्षरश: तोंडात बोटे घातली! महाराजांचे नियोजन इतके शास्त्रशुद्ध होते की भिंग लावून शोधले तरी त्यात त्रुटी सापडणार नाही.
सदर लेखात आपण महाराजांनी कोकणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरमार उभे करण्यापासून ते सागरी आणि किनारी दुर्गांची साखळी उभी करण्यापर्यंत माहिती घेतली आहे. त्यातील महाराजांनी नव्याने बांधलेल्या किल्ल्यांचे अभिनव प्रयोग पाहणार आहोत.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सामान्य दुर्गप्रेमींना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे काही पुस्तकातून तर शोधलेली आहेतच पण त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाऊन परीक्षण केली आहेत.( प्रा. प्र.के. घाणेकर सरांचे मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या "शिवरायांचे दुर्गविज्ञान " या नितांत सुंदर पुस्तकाचा एक उत्तम माहितीस्रोत म्हणून खूपच उपयोग झाला.)
महाराष्ट्राला जवळ जवळ 700 किलोमीटर ची किनारपट्टी लाभली आहे त्यात लहान मोठे अनेक दुर्ग आहेत. काही जलदुर्ग तर काही किनारी प्रदेशातील पाणकोट आहेत. त्यापैकी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य वेगळेच. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये विविधता तर दिसतेच परंतु त्यास स्थापत्यशास्त्र आणि विज्ञानाची जोड सुद्धा दिसते. त्यापैकी अलिबाग जवळील थळ ह्या किनारी किल्ले वजा गावापासून काही अंतरावर समुद्रात उभे आहेत दोन जुळे दुर्ग एक खांदेरी तर दुसरा उंदेरी.
#खांदेरी किल्ल्यावरील प्रयोग
उंदेरी हा किल्ला जंजिरेकर सिद्द्यांनी बांधला तर खांदेरी महाराजांनी बांधला आहे. खांदेरीचे बांधकाम हे इंग्रजांच्या सामर्थ्याला उघड उघड आव्हान होते. हा किल्ला बांधताना महाराजांना माहित होते की, या किल्ल्यावर कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात ती जास्त दिवस तग धरणार नाही. म्हणूनच कि काय महाराजांनी ह्या किल्ल्याच्या बाहेर काळ्या पाषाणाची रास आणून टाकलेली दिसते. त्याचे प्रयोजन असे की, ह्या दगडांच्या संपर्कात समुद्राचे खारे पाणी आल्यावर त्यावर 'बरन्याकल्स' या सागरी शिंपल्याच्या वर्गातील प्राण्याची वाढ होते. हे आपण कोकणात फिरताना पहिलेच असेल.
मग या दगडावर त्यांचे जणू अणुकुचीदार आवरण चढते. त्यामुळे अशा ठिकाणी लहान होडीतून उतरून जरी शत्रू किल्ल्यापर्यंत आला तरी त्याचा पाय कापला जाऊ शकतो. तसेच त्या जखमेत खारट पाणी जाऊन जी आग होणार ती निराळीच!
याव्यतिरिक्त भरतीत उसळणाऱ्या विशाल लाटांचा तडाखा किल्ल्याच्या तटबंदीला लागू नये हे सुद्धा कारण आहे. ( मरिन ड्राईव्ह ला फिरायला गेल्यास अशा प्रकारच्या लाटांच्या पासून किनाऱ्याचे संरक्षण व्हावे म्हणून कॉंक्रिट चे ब्लॉक टाकल्याचे आपण पाहतोच ना.) म्हणजे ज्या गोष्टींचा आपण आज उपयोग करतोय त्याचा विचार महाराजांनी 350 वर्षांपूर्वी केला होता हे विशेष.
#कुलाबा किल्ल्याची तटबंदी
कुलाबा हा किल्ला अलिबाग च्या समुद्रकिनारी आहे. भरती असल्यावर ह्या किल्ल्याला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडतो तर ओहोटीच्या वेळी चालत जाता येते.
ह्या किल्ल्याच्या बुरुजाच्या भिंतीचे बांधकाम पाहिल्यास आश्चर्य वाटते.कारण इतर किल्ल्यांच्या बांधकामात जसे दोन दगड सांधण्यासाठी चुना वापरतात तसं काहीच वापरलेले नाही आणि दोन दगडात लक्षात येईल अशा प्रकारचा गॅप ठेवलेला दिसतो.कशासाठी असेल बरे असे? हा प्रश्न पडतो.
सामान्यतः लाटांचा मारा ह्या भागात खुप असतो आणि पावसाळ्यात तर सागराला रौद्र रूप प्राप्त होते.अशा वेळी कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी ती टिकू शकत नाही. सागरी लाटांचा मारा जितका कमी करता येईल तितका कमी करायचा प्रयत्न या फटी करतात कारण लाटांचे पाणी या फटींमधून आत जाते आणि परत तटबंदीच्या तळातून बाहेर येते. तर अशा प्रकारचा प्रयोग महाराजांनी हा किल्ला बांधताना केला आणि ह्या बुरुजांच्या भिंतीचे आयुष्य वाढवले.
#पद्मदुर्गाचे बांधकाम
सागरात उंदराप्रमाणे फिरणारा आणि महाराजांना शेवट पर्यंत झुंज देणाऱ्या सिद्दीला शह देण्यासाठी जंजिऱ्याच्या मागील बाजूस दूर समुद्रात पद्मदुर्ग पाहण्यास मिळतो. महाराजांनी पद्मदुर्गचे बांधकाम करताना कुलाबा किल्ल्याच्या उलट प्रकारची पद्धत वापरली. इथे बांधकामाची भिंत बांधताना दोन दगडांना सांधायला चुन्याचा वापर करत असताना चुन्यासोबत आणखी बऱ्याच गोष्टी वेगवेगळया प्रमाणात वापरल्या. त्यामुळे पद्मदुर्ग आजही दिमाखात उभा आहे.
ह्या तटबंदीच्या भिंतीमधील दगड अक्षरशः लाटांमुळे झिजले आहेत पण चुना जशाचा तसा आहे. म्हणजे महाराजांनी नक्की कोणते केमिकल इंजिनीयरिंग वापरले हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
#सिंधुदुर्ग
मालवण स्थित सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे मराठ्यांची पाण्यातली राजधानीच. सुरतमध्ये मिळवलेली अमाप संपत्ती महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात वापरली. हा किल्ला सुद्धा महाराजांच्या सूक्ष्म निरीक्षण पद्धतीचा नमुनाच म्हणावा लागेल. मालवणला महाराज जेव्हा आले त्यावेळी महाराजांना सागरात एक बेट दिसले. त्यास 'कुरटे बेट' म्हणत. त्या बेटाच्या चहुबाजूंनी लहान मोठया अणुकुचीदार खडकांचे निसर्गतःच जणू काय संरक्षित आवरण आहे. इथे जर किल्ला बांधला तर शत्रुच्या मोठया होड्या किल्ल्यापर्यंत पोहचू शकत नाही. मराठ्यांच्या होड्या लहान आणि उथळ असत त्यामुळे त्या सहज किल्ल्यापर्यंत पोहचतील. तर अशाप्रकारे समुद्रातील नैसर्गिक गोष्टींचा अचूक अभ्यास करून महाराजांनी विशाल तटबंदीयुक्त बेचाळीस भक्कम बुरुजांचा किल्ला उभा केला. विशेष म्हणजे ह्या किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आहे चाळीस शौचालये.
गोमुखी बांधणीचे महाद्वार बुरुजांआड लपलेले सहज लक्षात न येणारे आणि शत्रूला बुचकळ्यात पाडणारे आहे. तसेच सर्व शिवप्रेमींच्या दृष्टीने सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या महाद्वारातील नगारखाण्यातील घुमटीत डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचे ठसे आहेत हे विशेष वंदनीय. हा महत्वपूर्ण वारसा जतन करणे गरजेचे आहे.
#विजयदुर्ग.
साधारणतः 1664 ला शिवरायांनी हा किल्ला जिंकून तो पाडून परत बांधला. आज त्या किल्ल्यावर जी तिहेरी तटबंदी दिसते ती महाराजांनी बांधली. ह्या किल्ल्याबद्दल जी गोष्ट काळाच्या उदरात लपली होती ती आता आता काही वर्षांपूर्वी कळली. ह्या किल्ल्याच्या उत्तर पश्चिमेला किल्ल्यापासून काही अंतरावर पाण्याच्या आत मानवनिर्मित एक 9 फूट जाडीची आणि जवळ जवळ पाऊण किलोमीटर लांबीची, काही अंशात कोनात वळवलेली भिंत बांधलेली आहे की जी भरती असो वा ओहोटी पाण्याच्या वर येत नाही.
ह्या संदर्भात एक ऐतिहासिक पत्र मिळाले. त्यात असा उल्लेख सापडतो की, "विजयदुर्ग जिंकण्यासाठी म्हणून इंग्रजी जहाजांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.त्यावेळेस गलबते तोफांचा मारा करण्यासाठी किल्ल्याच्या जवळ जाऊ लागली तशी एक एक करून तीनही जहाजे पाण्यात कशाला तरी आदळून फुटली आणि नष्ट झाली आम्ही कसे तरी किनाऱ्याला पोहत आलो." त्यातल्याच एका पोर्तुगीज खलाशाने हे पत्र लिहिल्याचे दिसते. वरील पत्र कमांडंट ऑफिसर ए. व्ही. गुपचूप यांना लिस्बन ह्या पोर्तुगाल च्या राजधानीत मिळाले. याचा शोध जेव्हा गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी ने घेतला तेव्हा त्याचे अवशेष लॅब मध्ये नेऊन त्याची " C14"
नावाची कार्बन टेस्ट केली.या टेस्टच्या आधारे ती भिंत मानवनिर्मित आहे आणि साधारण त्याचा कालावधी महाराजांच्या काळातील आहे हे स्पष्ट झाले.
ह्या भिंतीचे प्रयोजन पाहिल्यास आपणांस असे लक्षात येईल कि किल्ल्यावर सहजा सहजी जवळ जाऊन हल्ला होऊ शकत नाही. कारण इंग्रजी होड्यांचा तळ हा निमुळता आणि पाण्यात खोलवर बुडणारा असतो याउलट मराठ्यांची जहाजे छोटी उथळ तळाची त्यामुळे ती जहाजे ह्या भिंतिवरून सहज येजा करीत. वरील उदाहरण पाहिल्यावर थक्क होतो कारण आजपासून जवळ जवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी इतके प्रगत तंत्रज्ञान होते कि पाण्याचा आत पाऊण किलोमीटर लांबीची भिंत आपण बांधू शकलो. कशी बांधली असेल अशाप्रकारची भिंत?
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जो प्रयोग केलाय हे बघून भारतीय नौदल सुद्धा आश्चर्यचकित झाले.
मित्रांनो, काळाच्या उदरात असे शिवनिर्मित अनेक चमत्कार लपले असतील यांत दुमत नाहीच. गरज आहे त्याचा शोध घेण्याची. ह्या लेखाच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आहे कि, जलदुर्ग किंवा सागरी किल्ला म्हटले कि भारतीय पर्यटक नाव घेतो ते फक्त जंजिऱ्याचे पण इतर सुद्धा किल्ले आहेत जे पर्यटकांनी पहिले पाहिजेत. महाराजांनी बांधलेले किल्ले स्थापत्य शास्त्राची प्रतिकं आहेत. आणि ती आपण जरूर अभ्यासली पाहिजेत . जंजिरा जरूर बघा पण जंजिऱ्याच्या आसपास किती तरी सुंदर दुर्ग आहेत जे कि पर्यटकांच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत . अलिबागच्या किनारपट्टीवर पद्मदुर्ग, कोर्लई, रेवदंडा, खांदेरी उंदेरी हे किल्ले सुद्धा बघण्यासारखे आहेत.
माझा विरोध जंजिरा किल्ला पाहण्याला नाही पण त्यासोबत महाराष्ट्रात अनेक उपेक्षित जलदुर्ग आहेत जे दुर्गप्रेमींनी अभ्यासले पाहिजे, आणि त्यावर सहज जाता येता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळेल ना की त्याचे केंद्रीकरण होईल.अशा प्रकाराच्या ऐतिहासिक ठेव्यांचे निरीक्षण सुद्धा करता येईल. विचार करा मित्रांनो विजयदुर्गची भिंत पाहण्यासाठी जर शासनाने एखादी योजना राबवली तर आपल्या राजाच्या ठायी असलेल्या तात्कालीन जलदुर्गविज्ञानाचा प्रसार व प्रचार सातासमुद्रापार होण्यास मदत होईल. म्हणून माझी सर्व गडप्रेमींना विनंती आहे की हा ठेवा पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर नुसतेच ट्रेकिंगच्या नावाखाली न फिरता, दुर्गभ्रमंतीला अभ्यासू निरीक्षणाची जोड दया. म्हणजे त्यातून नक्कीच आपल्याला काहीतरी शिकता येईल.
जय शिवराय
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
सदर लेख कसा वाटला कंमेंट जरूर कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया मला अधिक लिहिण्यास उद्युक्त करतात तसेच आपल्या सखा सह्याद्री पेजला like आणि share करा म्हणजे आपल्या कल्याणकारी राजाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.
जय शिवराय!

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २६

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २६
किल्ले श्री. भरतगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.
मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो. मसुरे गावापर्यंत मालवणकडून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.
भरतगडाच्या पायथ्याला असलेल्या दर्ग्यापासून गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गावर सध्या पायर्या केलेल्या आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला रेलिंग उभारलेले असून मधून मधून विश्रांतीसाठी बसण्याची सोय केलेली आहे.
पायथ्यापासून पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचतो. समोरची तटबंदी डावीकडे ठेवीत जाणार्या पायवाटेने गडाच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागते. तटबंदी तोडून केलेल्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. लहान माथा असलेला भरतगड आयताकृती आकाराचा आहे. चारही बाजुंनी तटबंदी आणि बुरुजांनी तो परिवेष्टीत आहे.
संरक्षणाच्या दृष्टीने विचार करुन मारा करण्यासाठी तटबंदी आणि बुरुजांची रचना केलेली आहे. सध्या गडाच्या माथ्यावर आंबा, काजूची लागवड केलेली दिसते. गडाच्या माथ्यावर अतिक्रमणकरुन ही लागवड केली गेली आहे. पण यामुळे डोंगरमाथा हा हिरव्यागर्द झाडीने फुललेला आहे. या गर्द झाडीमधे धनेश पक्ष्यांचा वावर मोठय़ाप्रमाणावर दिसतो. येथे एकावेळी १२ धनेश पक्षी पहायला मिळाले.
गडमाथ्यावर मधे बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजुंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरुजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकर्यांची देवडी आहे. डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथर्यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे असल्याचे तेथिल फलकावरुन कळते. काही काळापुर्वीच याचा जिर्णाद्धार केल्यामुळे हे मंदिर सुस्थितीमधे आहे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे.
मंदिराच्या डावीकडे खोल विहीर आहे. मात्र याच्या पायर्या ढासळलेल्या असल्याने खाली उतरता येत नाही. पाणी काढण्याची काही सोय नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला वाडय़ाचे भले मोठे जोते पहायला मिळते. सर्वत्र झाडीझुडपांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे या परिसरात सावधगिरीनेच वावर करणे गरजेचे आहे.
डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे. वेळीच याची दुरुस्ती झाली नाही तर तटबंदीचा मोठा भाग नामशेष होईल. या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरुजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरुज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावलखाडीचे दृष्य दिसते. नारळी पोफळीच्या हिरव्यागर्द झाडीमधून संथ गतीने हेलकावणारी कालावलची खाडी खिळवून ठेवते. खाडीच्या पलिकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो.
तटाच्या कडेने परत फिरत आपण पुन्हा दरवाजा जवळ येतो. गडफेरी साधारणत: तासाभरात पूर्ण होते.
शिवरायांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला होता. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी आपल्या रक्षणासाठी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मधे इतर किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला इंग्रजाना मिळाला तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २५

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २५
मध्य प्रदेश मधील बुर्हानपूर वरील छापा
२८ जानेवारी १६८१
शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे , दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला .
उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.
राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले .
आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २४

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २४
रायगड म्हनजे प्रत्यक्ष शिवछत्रपतींची राजधानी मगती तशीच असनार. पण याच राजधानीची छाप शत्रुपक्षावरही होती याचे उदाहरण म्हनजे ईंग्रज वकिल “थाँमस निकोल्स” याने रायगडाचे केलेले वर्णन.
23 मे 1673 रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता.रायगड विषयी तो लिहीतो- ” सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठीकाणी पायरी केल्या होत्या आणि दरवाज्या जवऴ गेलो असता तोथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे 24 फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन 40 फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे. जर शत्रुने पहिली भिंत मीऴवली तर तर त्यांना हकलुन लावान्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. आशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्भेद बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.”
—(थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल.)

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २३

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २३
किल्ले श्री. मल्हारगड
महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग.या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते इ.स.१७६० च्या दरम्यान झाली, म्हणजे या गिरीदुर्गाचे वयोमान उणेपुरे अवघे अडीचशे वर्ष. अन्य दुर्गांच्या पंक्तीमध्ये वयोमानानुसार याचे अखेरचे स्थान म्हणून याला अभ्यासक तरुणगड असेही म्हणतात. पायथ्याला असणार्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशव्यांनी पुण्यातून कारभार सुरु केल्यानंतर, सरदार पानसेंना तोफखान्याचे प्रमुख म्हणून स्वतःच्या कर्तबगारीवर सरदारकी मिळाली. सरदार पानसेंनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी पुणे आणि किल्ले पुरंदर यांच्या मध्ये पुण्याजवळ किल्ला उभारण्याचे योजले. त्यासाठी त्यांनी क-हेपठरावरील सोनोरी गावाजव ळ डोंगराची निवड केली. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. पानसेंनी आपल्या उत्कर्षाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती केली परंतु ते आपल्या घराण्याच्या कुलस्वामी खंडेरायाला मात्र वि सरले नाहीत किल्ल्याला त्यांनी मल्हारगड असे नाव देवून आपल्या कुलस्वामी प्रती श्रद्धा व्यक्त केलेली आढळून येते. किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे ही एक दंतकथा सांगितली जाते ती पुढे दिलीच आहे, अशा दंतकथांना ऐतिहासक दस्तऐवज म्हणून पाहता येत नसले तरी त्यावेळचे समाजमन समजण्यासाठी यांचा उपयोग होतो.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.गडाची उंची समुदसपाटीपासून ३१६६ फूट आहे, इतर किल्ल्यांच्या तुलनेमध्ये मल्हारगड आकाराने लहान आहे, साधारणपणे साडेचार ते पाच एकर क्षेत्रावर, या किल्ल्याचा विस्तार आहे. तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी ब-यापैकी शाबूत आहे.
गड किल्ल्यांच्या उभारणीविषयी किंवा नावाविषयी अनेक दंतकथा, भयकथाआणि रंजककथा अबालवृद्धांमध्ये प्रिय असतात, अशाच प्रकारची एक दंतकथा सोनोरी गावातील वयस्कर व्यक्तींकडून ऐकायला मिळाली. अशा दंतकथा आचंबित करणा-या असतात, तर किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे एक आचंबित करणारी दंतकथा सांगितली जाते,'किल्ल्याच्या उभारणीचे बांधकाम चालू असताना तटबंदी अनेक वेळा ढासळत होती म्हणून खडक सुरुंग लावून फोडण्याचे ठरले, मजूर सुरुंगासाठी खाणत्या घेत असताना एके ठिकाणीरक्ताचा पाझर फुटला, हा अजब प्राकार पाहून मजूर काम सोडून पळून गेले, सरदार पानासेंच्या कानावर ही वार्ता गेली. अनेक प्रयत्न करून सुद्धा रक्ताचा पाझर काही केल्या थांबेना तेव्हा सरदार पानासेंनी जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायास नवस केला हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, तुझ्या नावाचा महिमा गायिन आणि आजन्म तुझी सेवा करीन' अशा रीतीने नवस बोलून जेजुरीहून आणलेला भंडार त्याठिकाणी वाहिल्यानंतर तो रक्ताचा पाझर थांबला, आणि गडाचे बांधका म सुरळीतपणे पार पडले. सरदार पानासेंनी बोलल्याप्रमाणे गडाला "मल्हार" असे नाव दिले तर गडावर छोटे खानी मल्हारी मार्तंडाचे मंदिर बांधले.
जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेला मल्हारगड सासवडच्या उत्तरेकडे आहे. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो, गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक किंवा पर्यटक येत नाहीत. जे जातिवंत भटके आहेत त्यांचाच केवळ राबता या गडावर असतो. त्यामुळे गडाचा परिसर मात्र अगदी स्वच्छ आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या नाहीत आणि इतस्ततः फेकून दिलेले कागद आणि प्लॅस्टिकचा केर-कचराही नाही. गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते. पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी लागते. गडावर पाणीही नाही आणि खायला काहीही मिळत नाही. डोंगराच्या सोंडेवरुनही गडावर प्रवेश करता येत असला तरी उजवीकडील बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. याठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेला बोगदा दिसतो त्याला सुईचे भोक (needle hole) असेही म्हणतात. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड् याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.
पुढे किल्ल्याच्या टोकावर असणा-या पश्चिम बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहीरीतही पाणी नाही. या बुरूजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ श्रीखंडोबाचे आणि दुसरे त्यापेक्षा थोडेसे मोठे देऊळ महादेवाचे आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.
सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेखऐतिहा सिक कागदपत्रांमध्ये आढळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहका-यांनीगनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी याच गडाचा आश्रय घेतला. बरेच दिवस ते किल्ल्याच्या आधाराने बचाव करू शकले होते. परंतु फितुरीचा शाप भोवला आणि इंग्रजांना कुणकुण लागलीच व गडावर साहेबी सैन्य थडकलं सुदैवाने क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निसटून जाण्यात यशस्वी झाले.
या गडाचे जनक, सरदार पानसे यांच्या वाड्याचे अवशेष सोनोरी गावात पहायला मिळतात. अंबारीसह हत्ती जाऊ शकेल अशा प्रवेशद्वाराची भव्यदिव्य कमान, तटबंदीचे बुरुज, मराठा साम्राज्याच्या वैभवाची आणि सुबत्तेची साक्ष देत आजही उभे आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस उत्तरेकडे तटबंदीला लागूनच सरदार भिवराव पानसे यांची समाधी आहे त्याच्या बाजूलाच पाण्याची मोठी पाय-यांची विहीर आहे. तटबंदीचे बुरुज, हत्ती बांधायची साखळी, वाड्यातील लक्ष्मी नारायणाचे मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिरप्रेक्षणीय आहे.पानसे यांचे वंशज आज तिथे राहत नाहीत, सारे जण नोकरी धंद्या निमित्त बाहेर असतात परंतु कृष्ण जन्माष्टमीचेवेळी बहुतांश इथे जमा होतात.
सरदार पानसे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची, जेजुरीच्या मल्हारी मार्तंडावर अपार श्रद्धा होती. त्यापैकीच महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे या बंधूद्वयांनी मल्हारी मार्तंडाच्या चरणी एक मण वजनाचा खंडा आणि ढाल वाहिलेली आहे ते आपणांस जेजुरगड मंदिरामध्ये पहावयास मिळते.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २२

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २२
किल्ले श्री. रतनगड
नाव रतनगड
उंची ४३०० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी अवघड
ठिकाण रतनवाडी, ता- अकोले
जवळचे गाव रतनवाडी
डोंगररांग पश्चिम घाट
इतिहास
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.
भंडारदर्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.
भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.
मुंबई – आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.
पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.
भंडारदर्याच्या खोर्यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.
साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्या लागतात. या कातळकोरीव पायर्यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.
या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.
इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.
याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.
गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.
गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.
रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.
अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.
येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २१

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २१
किल्ले श्री. यशवंतगड
सागर किनार्याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.
रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्यावर असलेला वेशिष्ठपूर्ण अशा यशवंतगडाची दुदैवाने कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे वळतच नाहीत.
हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसेसची सोय आहे. तसेच सावंतवाडी कडूनही आपल्याला शिरोडा गावामध्ये रहाण्याची तसेच जेवणाची सोय होवू शकते. रेडीपासून मालवण पर्यंत गाडीरस्ताही उत्तम आहे.
रेडीगावातून एक दीड किलोमीटर अंतरावार यशवंतगड आहे. रेडीच्या खाडीच्या किनार्यालाच लागून असलेल्या लहानशा टेकडावर यशवंतगड बांधलेला आहे. समुद्र सपाटापासून ५० मीटरची साधारण उंची आहे. गावातल्या नारळी पोफळीच्या जागा आणि त्यात असलेली कोकणी पध्दतीची वैशिष्ठपूर्ण घरे ओलांडून आपण यशवंतगडाजवळ पोहोचतो. येथ्नू एक वाट खाली पुळणीकडे जाते. उजव्या हाताला जाणारी पायवाट झाडीत शिरते. या झाडीत शिरल्यावर दोन मिनिटांमधे आपण एका बुरुजाजवळ पोहोचतो. बुरुजाला वळसा घातल्यावर गडाचे प्रवेशव्दार नजरेत भरते. हे कमानयुक्त प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडामधे केलेले असल्यामुळे प्रवेशव्दारही जांभ्यादगडामधे बांधलेले आहे.
प्रवेशव्दारामधून आत गेल्यावर पहारेकर्याच्या रहाण्याच्या जागांचे अवशेष दिसतात. गडाच्या आत बाहेर मोठय़ाप्रमाणावर झाडी झुडपे वाढलेली असल्यामुळे आतिल सर्व भाग झोकाळून गेलेला आहे. या प्रवेशव्दाराच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जाभ्यांदगडात बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेर बुजत चाललेला खंदकही दिसतो. येथेही एक प्रवेशव्दार आहे. त्याला काही पायर्याही आहेत. येथूनआत शिरल्यावर डावीकडे भक्कम बांधणीचा दरवाजा आहे.
हा दरवाजा वैशिष्ठपूर्ण आहे. दरवाजा बंद असल्यास बाजूला दिंडी दरवाजा केलेला आहे. हा वळणदार मार्ग दरवाजाच्या आत निघतो. अशा प्रकारच्या रचना महाराष्ट्रामधे दुर्मीळ आहे. कर्नाटकातील पारसगडाला अशा प्रकारची रचना केलेली आढळते. दरवाजाच्या आत पहारेकर्यांसाठी असलेली जागा आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे.
येथे समोरच दोन गोलाकार बुरुजांच्या मधे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा आहे. गोलाकार बुरुजांमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसर्या आणि तिसर्या दरवाजाच्या मधील जागेत बंदिस्त चौक आहे. या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे.
बालेकिल्ल्याच्या तिसर्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डावीकडे मोठी इमारत आहे. सरळ जाणारी वाट तटबंदी कडे जाते. तटबंदीवर झाडी खूप वाढल्यामुळे तटबंदीवर फरी मारता येत नाही. या तटबंदीवरुन फेरी मारताना काही ठिकाणी पंचविस ते तीस फुट उंचीची तटबंदी आहे. शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या केलेल्या दिसतात तसेच मजबूत बुरुजही दिसतात. तटबंदीवर वाढलेल्या झाडीमुळे मात्र त्यांची पार रया गेलेली आहे.
मधल्या भागामधे भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, तुळ्या कालौघात नामशेष झालेले असले तरी वाडय़ाची भव्यता लक्षवेधक आहे.
बालेकिल्ल्याची भक्कम सुरक्षा व्यवस्था स्मरणात ठेवीतच आपण पुन्हा माघारी निघतो. खरे तर कोकणातील काही किल्ले हे एप्रिल - मे मधे गवत आणि झुडुपे कमी झालेली असताना पहाण्यात मजा आहे.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग २०

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग २०
किल्ले श्री. कुलंगगड
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.
या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो.
कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.
समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्या आहेत. या पायर्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.
कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.
गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवूनच.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १९

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १९
किल्ले श्री. चावंड
चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे.
नाव चावंड
उंची ३४०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण जुन्नर तालुका, पुणे जिल्हा,
महाराष्ट्र
जवळचे गाव चावंड
डोंगररांग नाणेघाट
माहिती
चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥
गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे.
इतिहास
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुर्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंड, चाऊंड, चावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लुट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला. संदर्भ - अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे- चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले. संदर्भ - गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
१) जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
४) चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
५) चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रुपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
६) सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत.
गडावरील ठिकाणे
दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाा ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेट ायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
राहण्याची सोय: गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १८

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १८
किल्ले श्री. प्रबळगड
मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन जातांना दिसणारा हा नावाप्रमाणे बलवान असणारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधून घेतो. पूर्वेला उल्हास
नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला, तसेच जवळच असलेला इर्शाळगड
असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.
नाव प्रबळगड
उंची २३०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी कठिण
ठिकाण रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव पनवेल
डोंगररांग माथेरान
इतिहास :
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्य निर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजियाच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.
गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे.
प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुभ्रिक्षतेमुळे तो विचार मागे पडला.
गडावर तीन चार ईमारतींनचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.
मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
शेडुंग मार्गे- : मुंबईहून किंवा पुण्याहून येणा-यांनी पनवेल गाठावे. पनवेल पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस्.टी चालकांना सांगून शेडुंग फाटावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी. अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून ठाकुरवाडीपर्यंत चालत यावे. अंतर ५ कि.मी. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावगावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते.प्रबळमाचीवर जाण्यास दीड तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच एक घळ दिसते. या घळीतून गडावर जाण्यास एक तास पुरतो.ठाकूरवाडी / अेिश्रे पर्यंत जाण्यास पनवेलहूनही बसेस आहेत.
पोईंज मार्गेः-पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणा-या डोंगर सोंडेवरून प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबळगड गाठावा.माथेरान ते प्रबळगड :- माथेरान जवळील शार्लोट जलाशयाजवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटात आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिडांच्या सहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १७

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १७
किल्ले श्री. कर्नाळा
ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो
रायगड जिल्हातील पनवेल तालुकातील हा किल्ला आहे.
नाव कर्नाळा
उंची ४४५ मी.
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण रायगड जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव शिरढोण
डोंगररांग सह्याद्री
इतिहास :
१२-१३ व्या शतकातला या किल्याचा जन्म. तेव्हा यादवांनी (देवगिरी राजधानी) येथे राज्य केले. १४ व्या शतकात दौलताबादच्या मुस्लिमांनी हा किल्ला ताब्यात घेतला. १६ व्या शतकात येथे निजामशाही नांदली. १६७० मध्ये कर्नाळ्याचे भाग्य उजाडले. कर्नाळा स्वराज्यात आला. किल्ल्यावर मराठेशाही आली. या सर्दंभात प्र. के. घाणेकरांनी एका पुस्तकात लिहीलय:
मराठ्यांनी पनवेलपासच्या डोंगराला प्रथम वेढा घातला. मग फळ्या व चिखलाच्या भिंती बांधत, त्या आडुन हल्ला करत ते तटाशी पोहोचले आणि मग कर्नाळा घेतला. याची मराठी कागदपत्रातली नोंद अशी : " शके १५९२, साधारण संवत्सर. आषाढ शु. १४ ला कर्नाळा घेतला". स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते.
कर्नाळा पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला, मग पुन्हा मराठ्यांनी जिेकला. मग आंग्रे, पेशवे आणि सरतेशेवटी इंग्रज असे सत्ताधिश झाले. १८१८ मध्ये सर्व किल्ल्याविरोधी उघडलेल्या मोहीमेत कर्नल प्रार्थरने कर्नाळा जिेकला.
माहीती :
पनवेल कडुन मुबंईकडे येताना गोवा महामार्गावर एक सुळका येणा-या-जाणा-यावर डोळे काढुन उभा आहे... हो तोच कर्नाळ्याचा सुळका !! गेली कित्येक शतके, पनवेल बोर घाटातुन मुंबई चौल बंदराकडे होणा-या व्यापारी वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवुन हा किल्ला उभा आहे.
पनवेल परीसरात दोन मनोहारी सुळके - एक प्रबळचा सोबती, प्रबळगडवरुन दिसणारा, नावानुसार सुंदर कलावंतीण दुर्ग ! आणि दुसरा महामार्गावरच्याना खुणावणारा किल्ले कर्नाळ्याचा (उंची ४४५ मीटर)!!!
नवी मुंबईकरांना अगदी जवळचा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेक साठी मस्त. वाट अभयारण्यातल्या जंगलातुन असल्याने भर उन्हातही ट्रेक करता येतो. मला तर हाकेच्या अंतरावर! बाईकला किक मारली की १५ मिनीटात पायथ्याला....
smile emoticon
पार्किंग पासुन चढाईला सुरवात करताच छोटा ओढा लागतो. पावसाळ्यानंतर गेलात तर थोडेफार पाणि नाहीतर दगडांनी भरलेला. नंतर पक्षी अभयारण्यातुन थेट किल्ल्याला वाट जाते. घनदाट झाडी असल्याने ब-यापैकी थंडावा असतो. निरनिराळ्या पक्ष्यांची, झाडांची निरीक्षणे करत, जंगलातुन, दाट सावलीतुन चढण संपवली म्हणजे तुमचा पहीला टप्पा फत्ते झाला. जंगलात ब-याच पाउलवाटा आजुबाजुला जातात; जंगलाच्या निरनिराळ्या क्षेत्रात, पक्षी निरीक्षणाच्या. पण आपल्याला किल्ल्याकडे जायचे असल्याने चढती वाट समोर ठेउन जास्त उजवे-डावे न करता चढावे.
चढण संपली की लागते मोठा सपाट माळ, डोक्यावरचे जंगलाचे छप्पर मागे टाकलेले आभाळ आणि उजव्या हाताकडे कर्नाळ्याचा दुर्ग!!
इथुन साधारण २००-२५० मीटर्स वर कर्नाळा सुळका. एकदा का किल्ला नजरेच्या टप्प्यात आला की पाय आपोआप गती घेतात.
थोड्याच वेळात उजव्या हाताला कर्नाईदेवीचे छोटेखानी मंदीर लागते. सिहांवरती आरुढ, हातात तरवार, गदा असलेली मुर्ती रेखीव आणि सुबक आहे आणि विशेष म्हणजे भग्नावस्थेत नाही. मुर्ती अखंड पाषाणात घडवली आहे.
दर्शन घेउन पुढे जाताच स्वागताला सज्ज असतो पहीला दरवाजा ... दोन बुरुजात, बारीक कमान (जवळपास मोडकळीस आलेली) असलेला...इथुन मागे वळुन आपण आलेली पायवाट बघण्याची मजा काही औरच!!
smile emoticon
दगडी पाय-यांवरुन जरा पुढे सरकले की मुख्य दरवाजा लागतो. हा त्यामानाने मजबुत, भक्कम आणि चिंचोळ्या दगडी जिन्याने गडावर पोहोचवणारा आहे. एका वेळी एकच माणुस वरती यावा अशी आतुन रचना.
हा दरवाजा पार केला की आपण पोहोचतो गडमाथ्यावर आणि सुळक्याच्या पायथ्याला! तिथे एका घरासारख्या इमारताचे अवशेष सुस्थीतीत आहेत. ती नक्कीच जास्त जुनी ईमारत नाही. तिच्याबद्दल जास्त माहीती मिळाली नाही (कोणास माहीत असल्यास कमेंट मध्ये कळवावी).
आता पहायचा तो कर्नाळ्याचा सुळका! ... हा नुसता सुळका नव्हे, शतकोनशतके उन-वारा-पाऊस-थंडी सोसत, चहुबाजुनी परीघालगत पोटात खोदीव पाण्याची टाकी जपत आणि शिवकालीन, कालपुर्व, शिवकालोत्तर इतिहास पिढ्यापिढ्यांना सांगत तो अखंड उभा आहे. एकुण उंची ४७५ मीटर. "जैत रे जैत" गो. नी. दांडेकरांची कादंबरी आणि त्यावरील चित्रपटातल्या "लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला" गाण्यातला डोंगर तो हाच! साधारण ३०-३५ मीटर उंचीचा सुंदर सुळका म्हणजे पुरुषार्थाला आव्हान. वर चढायला दगडात ब-यापैकी खोबणी आहेत. सुळक्याच्या माथ्यावर शिवदुर्गप्रेमी किंवा कोण्या hikers संघटननेने पत्र्याचा भगवा ध्वज उभारला आहे. ब-याच लांबुनही तो व्यवस्थीत दिसतो. सुळक्याच्या पोटात सर्व बाजुंनी पाण्याची टाकी खोदली आहेत. कातळाच्या आत टाक्यांत नैसर्गिक पाण्याचा साठा करण्याचे २ फायदे : उन्हापासुन पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि कातळात जमिनीखाली असल्याने शीतलता टिकुन राहते.
सुळका समोर ठेउन डाव्या बाजुला उतरले की आपण दुस-या भक्कम दरवाज्यातुन गडाच्या माचीवर पोहोचतो. हा दरवाजा दगडी चि-यांच्या बुरुजात चपखल बसवला आहे. दरवाज्यात शिरायची वाट चिंचोळी आहे. वाटेत एक देवडी आहे. दरवाज्याचे मुख खालच्या पातळीवर आहे म्हणचे साधारण १० पाय-या उतरल्या की आपण दरवाज्यात येतो. दरवाज्यावर शुभपुप्षे व दोन शरभशिल्पे आहेत. आतिशय कोरीव आणि आजही सुस्थीतीत!! दरवाज्याच्या पुढील पाय-या ढासळल्याने काळजापुर्वक उतरावे. दगडी चि-यांत कापलेली चौकट न घडीव कमान पाहुन कारागिराचे आपण मनोमन कौतुक करतो.
दरवाजा आपल्याला माचीवर सोडतो. थोडीफार ढासळलेली तटबंदी आणि विर्स्तीण माळ. तटबंदीत जागोजाग कडाबिनींसाठी (Guns) जागा आहे. या माळावरुन मागे सुळका सुरेख दिसतो. त्याच्या पार्श्वभुमीवर छायाचित्रे घेण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. इथुन परततांना सुळक्याच्या कडेने एक ढोरवाट खालीकडे जाताना दिसली. कदाचीत तिने सुळक्याच्या थोड्या मागे जाता येइल, आम्ही गेलो नाही.
कर्नाळ्याच्या वाटेवर
मुबंई वा पुण्यावरुन पनवेलला पोहोचायचे. पनवेलवरुन गोव्याकडे जाणा-या कोणत्याही बसने कर्नाळा अभयारण्याला उतरता येते. स्वत:ची गाडी असेल तर पनवेल वरुन मुबंई-गोवा महामार्गाने निघायचे की थोड्याच वेळात अभयारण्याला पोहचतो. पनवेलवरुन १३ कि.मी. अंतर!
अभयारण्याच्या जागेत अल्प दरात पार्कींग उपलब्ध आहे. पार्कींग समोरुनच अभयारण्यातुन वाट गडाकडे जाते.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

Saturday, 25 April 2020

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १६

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १६
पावन खिंड
स्वातंत्र्याच्या सुर्या प्रसन्न हो, आता तरी प्रसन्न हो |गजापूर ची खिंड पावन झाली , पावन खिंड... दाट
वृक्षराजीखाली, लवलवत्या तृनंकुरांच्या संगतीत निर्जन एकांतात सह्याद्रीच्या कुशीत समाधीच्या पवित्राने आणि सतीच्या गांभीर्याने उभी असलेली ती पहा गाजपुरची खिंड.
हीच ती वाट याच वाटेवर रक्ताचे आणि घामाचे थेंब सांडले, येथून ती पालखी गेली वारकर्यांची धडकार्यांची.इतिहास उगवतो तो रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून अत्तराच्या आणि गुलाब पाण्याच्या थेम्बातून नव्हे ती ही पावन खिंड. पान्हाळगड पासून १७ कोसावर आहे: अवघड आहे तिचा मार्ग खच खळग्यांनी आणि कट्याकुट्यानि सजला आहे.एका भयंकर घटसर्पाच्या तडाक्यातून हिरडस मावळातल्या गरीब शेतकर्यांनी स्वराज्याचे प्राण वाचवले ते याच खिंडीत.बाजीप्रभूंच्या आणि मावळाच्या रक्ताचे आणि घामाचे थेंब टप टपले ते याच खिंडीत,पावन खिंडीतील मातील सुघंद आहे बाजींच्या आणि फुलाजी प्रभूंच्या त्यागाचा.जर तेथील मुठभर माती पाण्यात टाकली तर त्याला रंग चडेल बाजींच्या रक्ताचा, जर तेथील जमिनीला कान लावला तर आवाज एकू येईल बाजींच्या तोंडून कडाललेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा,
हर हर महादेव | हर हर महादेव...
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १५

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १५
किल्ले श्री. पन्हाळ गड
नरवीर बाजीप्रभून च्या पराक्रमाची साक्ष असलेला पन्हाळा
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे.
नाव पन्हाळा
उंची ४०४० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर, महाराष्ट्र
जवळचे गाव कोल्हापूर
डोंगररांग कोल्हापूर
भौगोलिक स्थान
आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.
इतिहास
पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव पन्नग्नालय .अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला.छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकुन पडले होते. गुप्तहेरांनी शोधुन काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरुन निसटले. पुढे पावनखिंडीत(घोडखिंड) नरवीर बाजी प्रभु देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जौहरच्या सैन्याला आपल्या प्राणांचे बलिदान देउन थोपविले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला होता. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.
ऐतिहासिक घटना
हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
* राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय.वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.आज यात नगरपालिका कार्यालय,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बाॅईज होस्टेल आहे.
* सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यास ठेवले होते.शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
* राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले.हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
* अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारेआहेत.यात वरी,नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे.याशिवाय सरकारी कचे-या ,दारुगोळा अणि टाकंसळ होती.
* चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय.इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला.थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत.येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
* सोमाळे तलाव -गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
* रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी -सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
* रेडे महाल-याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुत- ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
* संभाजी मंदिर-त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
* धर्मकोठी-संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
* अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते.ही वास्तू तीन मजली आहे.सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे ,तर मधला मजला ऐसपेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
* महालक्ष्मी मंदिर-राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे .राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
* तीन दरवाजा-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा .दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला. बाजीप्रभुंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.
कसे जाल ?
चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║