Aakanksha BhosaleMaratha Empire🚩
नाव :- रायरेश्वर किल्ला
उंची :- १३३७ मीटर
किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- महादेव डोंगर
चढाईची श्रेणी :- सोपी
ठिकाण :- रायरेश्वर
तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत
सध्याची स्थिती :- व्यवस्थीत
हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.
शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले. मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली.
हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात #कान्होजी_जेधे, #बाजी_पासलकर, #तानाजी_मालुसरे, #सूर्याजी_मालुसरे, #येसाजी_कंक, #सूर्याजी_काकडे, #बापूजी_मुदगल, #नरसप्रभू_गुप्ते, #सोनोपंत_डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली.
गडावर पवित्र रायरेश्वर मंदिर, पांडव लेणी, गोमुख तळे जिथे वर्षाचे १२ महिने शुध्द पाणी असते,
रायरेश्वर किल्लाचा हा एक नैसर्गिक अद्धभूत आविष्कार आहे. येथे सप्तरंगी मातीची खाण जिथे सात रंगाची माती एकाच ठिकाणी पाहायला मिळते. निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते.
रिव्हर्स वाटरफाॅल पाँइट, रिव्हर्स व्हाॅइस पाँइट, सनसेट पाँइट, शिवकालीन तळे अशी अनेक पाहण्यासारखे पाँइट आहेत…!
पायथ्यापासून गडावर जाण्यास पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर आपण लोखंडी शिडीपाशी पोहचतो आणि शिडीच्या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचतो. समोरच आपल्याला रायरेश्वराचे अवाढव्य आकाराचे पठार नजरेस येते. गड चढण्यास २० मिनिटं वेळ लागतो. पठारावर विस्तीर्ण झाडे आहेत. उंबराचे आणि जांभळीचे वृक्ष आढळतात आणि इतरही झाडे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी महादेवाची पूजा करण्यासाठी कर्नाटकातून एक जंगम आणले होते तर आता गडावर ४० कुटुंब झाली आहेत आणि सर्व जंगम समाजातील आहेत. गडावर शेती करतात, शेती मध्ये भात, बाजरी, जेवारी गहू आणि भाजीपाला हे पिके घेतात. गाई आणि बैलं आहेत, पठारावर चरण्यासाठी भरपुर गवत आहे.
• गडावर जाण्याची वाट - पुणे - भोर - आंबवडे - कोरले घाटाचा रस्ता आहे ते रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी जातो.
• राहण्याची सोय - रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या पत्रांच्या शेड मध्ये होऊ शकते.
• जेवणाची सोय - गडावर राहण्यासाठी लोकवस्ती आहे तेथे होते. सर्व जंगम समाजाचेच लोक आहेत.
• पाण्याची सोय - गोमुख तळे जिथे वर्षाचे १२ महिने शुध्द पाणी असते.
No comments:
Post a Comment