जुन्नर तालुक्यातील “कुकडेश्वर शिवालय”....
कुकडी नदीच्या तीरावर, पुर गावी जुन्नर-घाटघर रस्त्यावर नाणेघाट जवळ चावंड (जुंड उर्फ प्रसन्नगड) या किल्ल्याच्या जवळ पुर नावाचे गाव आहे वस्तिपासून थोडेसे अलग कुकडी नदीच्या तीरावर एक पुरातन शिवालय आहे कुकडी नदीच्या तीरावर असल्यामुळे याचे नाव “कुकडेश्वर” असे पडले...
तसा हा परिसर पुरातन शिल्पे आणि विरगळी यांनी भरलेला आहे मंदीर पश्चिमाभिमुखी आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आतमधे आणि अगदी गाभार्यापर्यंत सुरेख शिल्पे आहेत मंदिरामधे प्रवेश करताना दरवाज्यावर असणारी वेलबट्टी (द्वारशाखा) अप्रतिम आहे...
मंदिराच्या सभामंडपाच्या खांबावर उत्कृष्ट कलाकुसर आहे गाभारा छोटा आहे पण ऐस पैस जागा आहे.आतले शिवलिंग हे आकाराने लहान पण सुबक आहे मंदिराच्या बाह्य अंगावर २ अप्रतिम शिल्पे आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला ही ठेवण्यात आली आहेत ह्यांना वेताळ अथवा कीर्तिमुखे म्हणतात...
शंकराच्या पुरातन मंदिरामधे शक्यतो कालभैरव, गण, वेताळ, कीर्तिमुखे आढळून येतात या ठिकाणी असणारी शिल्पे वेताळ आहेत का कीर्तिमुखे हा वाद असला तरी आहेत अप्रतिम तसेच इथली २ शिवशिल्पे विशेष आहेत एक पाय खाली सोडून बसलेली शिवमूर्ति तसेच नृत्यमग्न शंकर हेही पाहन्यासारखे तसेच कमलामधे नृत्य करणारी नर्तकी, दोन स्त्रीमूर्ति, गद्देगल, सती शीला, शिवपार्वती शिल्प, नागशिल्पे अत्युकृष्ट आणि अवर्णनीय...
तसेच राजा झंझ ने बांधलेल्या प्रत्येक मंदिरात आढळून येणारे वैशिष्ट्य इथेसुद्धा आहे प्रत्येक शंकराच्या मंदिरात आढळून येणारे ‘विष्णु शिल्प’ इथे सुद्धा दिसते हे शिल्प वराह अवतारातील आहे एवढी दशके उलटून सुद्धा मंदिर सुस्थितीमधे आहे ऐतिहासिक वारसा जतन केला जातोय...
: प्र.के.घाणेकर सरांच्या भाषेत अर्धा तास आपल्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या मंदिरामधे आहे...
फोटोग्राफी : @ravi_inamdar09
No comments:
Post a Comment