Followers

Sunday, 16 May 2021

लक्ष्मीनारायण मंदिर, पेडगाव





 लक्ष्मीनारायण मंदिर, पेडगाव

महाराष्ट्रातील प्राचीन आणि मौल्यवान ठेवा असणारे हे मंदिर चालुक्य कालीन बदामी शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. कोरीव काम एवढे सुरेख आहे कि काही जण याला चित्रमंदिर असे संबोधतात.
मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशव्दार आहेत. प्रवेश व्दारांच्या व्दार शाखांवर आणि पट्टीवर सुंदर शिल्पकाम आहे. तिन्ही प्रवेशव्दारांच्या बाजूच्या भिंतींवर सुंदर गवाक्ष कोरलेली आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. देव कोष्ठकात दक्षिण दिशेला वराहाची, पूर्वेला विष्णूची मुर्ती आहे. उत्तरेच्या देव कोष्ठकातील मुर्ती ओळखण्याच्या पलिकडे झिजलेली आहे. मंदिराचा सभामंडप १२ खांबावर तोललेला आहे. सभामंडपावरील कळस ४ खांबावर तोललेला आहे. कळसाच्या आतील भागावर कमळ कोरलेले आहे. त्याच्या चारही कोपर्यात व्यालमुख आहेत. अंतराळाच्या छतावरही अशाच प्रकारचे कोरीव काम आहे. सभामंडपाच्या खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. मंदिराच्या गाभार्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात लक्ष्मी नारायणाची मुर्ती नसून एक वीरगळ ठेवलेली आहे.
.
.
- रोहन गाडेकर

No comments:

Post a Comment