Followers

Saturday 29 May 2021

• राजा श्री शिवछत्रपतींचे शिलेदार नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची शौर्यगाथा :

 " तुझ्या शौर्याची साक्ष मिळते आजही आम्हा कड्याकपारीत, होती तुझी समशेर वीरा अन्यायाचे तुकडे उडवीत."

" हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, जय शिवराय."

• राजा श्री शिवछत्रपतींचे शिलेदार नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची शौर्यगाथा :
मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - मृत्यू : १६ मे, १६६५) हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे, १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.
सैनिकी कारकीर्द संपादन करा
जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजीला मराठा सैन्यात दाखल करून घेतले.
स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली,
• वीर मुरारबाजींची समाधी :
"श्री शिवछत्रपतींचे शिलेदार नरवीर मुरारबाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा,
जय शिवराय." 🚩
तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेवून ११ जून, १६६५ या दिवशी एक महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला....दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले....त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आह

No comments:

Post a Comment