Followers

Monday 3 May 2021

स्त्री शक्तीची, जिद्दीची व कल्पकतेची साक्ष देणारी बारव..

 


स्त्री शक्तीची, जिद्दीची व कल्पकतेची साक्ष देणारी बारव..
पोस्टसांभार : 'सचिन पोखरकर'
इ.स १७०० ते १८०० चा काळ म्हणजे भारत सामाजिक अनिष्ट प्रथा, गुलामी, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव, जाती पती, उच्च नीच आणि सर्वात महत्वाचे स्त्री पुरुष भेद (जो आजही बराच कमी झाला असला तरी संपला नाही) ह्या साऱ्यात गुरफटून होता...
ह्या काळात स्त्री शिक्षणासारखे सामान्य प्रश्नच बुद्धिवादी म्हणवणाऱ्या पुरुषवादी संस्कृतीस मान्य नव्हते, स्त्री चे बाकी हक्क व अधिकारांची कल्पनाही सहन होत नव्हती त्याच काळात अहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर मधील जामखेड तालुक्यातील चौंडी गावी झाला वयाच्या ८ व्या वर्षी खंडेराव होळकर यांसाठी मल्हारराव होळकर यांनी अहिललाबाई यांस सून म्हणून आणले १७५४ साली पती खंडेराव होळकर लढाईत धारातीर्थी झाले पुढे सासरे मल्हारराव होलकरही गेल्यानंतर १७६७ साली राजगडाची जबाबदारी अहिल्याबाईंवर आली....
खरतर पती गेल्यानंतर त्या काळी पत्नीने सती जाण्याची प्रथा होती मात्र मल्हाररावांनी जणू भविष्य हेरले असावे म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही पुढे १७६७ ला त्या राजमाता व राज्यकर्त्या झाल्या. राजवैभव हाती आलं, सत्ता होती, सैन्य होत... ऐशो आराम होता.. त्यात अहिल्याबाई रमल्या नाही त्यांना प्रजा व रयतेचे दुःख शांत बसू दे नव्हते...
राजगादी हातात आल्यावर त्या रमल्या किंवा थांबल्या नाही स्वतःच्या कल्पकतेने दुरदृष्ट्या अहिल्याबाईंनी प्रजे साठी धोरणात्मक कामे करण्याचं ठरवत भारतभर अनेक कामे केली भारताच्या अनेक भागांत सीमा व हिस्सा न बघता अनेक घाट बांधीले अनेक नद्यांना घाट, तिर बांधले, अनेक बारवा बांधून दिल्या, कित्तेक मंदिरे व धर्मशाळा बांधून वाटसरू व प्रवाशी सुखी केले स्वत:ला मिळालेल्या संधीचा समर्थपणे उपयोग करून इतरांच्या सुखसोयी वाढविणारी, अडचणी दूर करणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर...
अहिल्याबाई होळकरांच्या ह्या अलौकिक कामांची साक्ष देणारी ही बारव मुंबई नाशिक मार्गात लागणार कसारा घाट चढताना दक्षिण दिशेस (उजव्या हातास) दिसते कसारा घाट म्हणजे "थळ घाट" थळ घाटाला मोठा प्राचीन इतिहास आहे पूर्वीपासून ह्या घाटातून मोठी व्यापारी वाहतूक होत असायची ह्या वाटेत प्रवाशी व व्यापारी सोबत सैन्यासही तहान भागवण्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर विसंबून चालावे लागत असे हीच बाब लक्षात घेत अहिल्याबाई होळकर करवी ह्या बारवेच काम केले गेले...
घाटात नाशिक कडे चढताना रेल्वे बोगद्याच्या पुढे येताच उजव्या हातास गोल घुमटाकार वास्तू दिसून येते साधारण उलट्या टोपलीच्या आकाराची किंवा इगलू समान दिसणारी ही प्राचीन वास्तू कुणाचेही लक्ष वेधते बारव मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच आहे १५ फूट व्यासाची बारव पूर्ण दगडी बांधकाम सुबक पद्धतीने बांधलेली आहे झाड पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनवले आहे दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत्र बनवताना बारवीच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचं काम केलेले दिसते बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर ह्याच बारवेच पाणी ओढून नेट असतात.. बारव किती खोल आहे याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्या मुळे येत नाही मात्र आजही बारव स्वच्छ व सुंदर असून तिच्यात थोडीही पडझोड झालेली नाही बारावेवर कुठेही शिलालेख किंवा नक्षीकाम नाही स्थानिक व अभ्यासकांच्या मतानुसार ही बारव अहिल्याबाई होळकरांचीच बांधलेली असल्याचं समजल..
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे त्याची खरी प्रचिती ह्या बारव व असंख्य धर्मशाळा देवळे व घाट बघताना येते...
आजही बारव आपले जलदानाचे काम इमानेइतबारे करताना पाहून मान आपसूक अहिल्याबाई होळकरांकडे झुकते....
राजमाता .. जनमाता...🙏🙏
माहिती साभार : Bsf Fodase
..
फोटो साभार : Snehal Prasade

No comments:

Post a Comment