Followers

Saturday 29 May 2021

घाटवाटा दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या भाग २ बोचेघोळ


 घाटवाटा दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या

भाग २  बोचेघोळ

पोस्तसांभार :प्रसाद वाघ 


नाव : बोचेघोळ
प्रकार : घाट
घाटावरचे गाव : खानू / खानूचा डिगा (८९० मी ) / माणगांव
पायथ्याचे गाव : वारंगी (११० मी )

श्रेणी : अवघड (वाटेत कुठेही टेकनिकल पॅच नाही परंतु माणगांव गाठण्यासाठी शारीरिक क्षमता हवी.)

पाणी : वारंगी मधून निघाल्यानंतर साधारण ( २० मिनिटे) जिथून चढ चालू होतो तिथे नदी पात्रात बारमाही पाण्याचे टाके आहे. कधीकधी पाणी खोल असते तर छोटासा दोर घेऊन गेल्यास उत्तम. इथून पुढे १ ते १. ३० तास चढाई केल्यावर हेदमाचीच्या अलीकडे फेब्रुवारी पर्यंत पाणी उपलब्ध होते. हेदमाची पासून घाटमाथ्यावर यायला १. ३० ते २ तास लागतात. इथून पुढे खानूच्या डिग्यास व पुढे माणगांवला जायचे असल्यास घाटमाथ्यावरून समोरच्या डोंगरात पाण्याचा स्रोत आहे . इथून पुढे पाऊण एक तासात आपण खानूच्या डिग्याला पोहचतो तिथे पाण्याची विहीर आहे.

वेळ : वारंगी मधून सह्याद्री घाटमाथा गाठायला ३. ३० ते ४ तास लागतात. इथून खानूला जायचे असल्यास पुढे १ तास लागतो. घाटमाथ्यवरून खानूचा डिगा व पुढे माणगांव गाठायचे असल्यास समोरचा डोंगर चढून खानूचा डिगा १ ते १.३० तासांत गाठता येतो. पुढे २ ते २.३० तासात माणगांवला पोहचता येते.

फोटो : वारंगी गावातून बोचेघोळ 

No comments:

Post a Comment