Followers

Sunday 16 May 2021

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर







 गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

मंदिर स्थापत्य
( गोंदेश्वर मंदिर: ०१)
नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक. यादव काळातील हे मंदिर नाशिकचं सौंदर्य आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. मंदिराची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे.

No comments:

Post a Comment