#VidarbhaDarshan -
चिटणवीस वाडा, नागपूर
चिटणवीस वाडा, नागपूर
आहा.... कित्ती छान वाडा !
होय...... प्रत्येकाचे हेच उदगार ....
'रख्माजी गणेश रणदिवे' हे भोसले दरबारातील पहिले चिटणवीस होते. (1729-1771) ते रघुजी पहिले यांच्यासोबत 1744 साली नागपुरात आले तेव्हा हा वाडा बांधण्यात आला होता. या वाडयाला आज 250 वर्षाहुन अधिक काळ झाला आहे. वाडयाचे वैभव आजही दिमाखात उभे असून या भल्या मोठ्या वाडयाचे संपूर्ण बांधकाम विटा, माती आणि लाकडात झालेले असून श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे असणारा सुशोभित दिवानखाना, भुयार, नंदीघर, देवघर, पाटा-वरवंटा, जातं, जूनी पितळीची भांडी पाहुन इतिहासकालीन स्मृती जाग्या झाल्या.
(माहीती - कल्पना गुलालकारी)
(फोटो - हर्षल भांबुलकर)
No comments:
Post a Comment