Followers

Sunday 12 July 2020

⛰️⛳ *कुर्डुगड* (विश्रामगड) ⛰️⛳






⛰️ *कुर्डुगड* (विश्रामगड) ⛰️
या माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डुगडाचा किल्ला दबा धरुन बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोर्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला *विश्रामगड* असेही म्हणतात.

सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणार्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुर्डुपेठ नावाची
सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हणी घाटाचे रक्षण करण्यासाठी *कुर्डुगड* ( *विश्रामगड* ) हा किल्ला बांधण्यात आला होता.
*कुर्डुगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत.* त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगाव कडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो. जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डुगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डी मधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डुगडास जाण्यासाठी मोसे खोर्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जावून मोसे खोर्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावा जवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डुगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपिट करावी लागेल. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.
ताम्हीणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरुन कुर्डुगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होवू शकते. उंबर्डी मधील प्राचिन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुर्डुपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेवून दहा मिनिटांमधे किल्ल्यात पोहोचता येते. वाटेजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामधे गावकरी करतात.
हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाईकरुन आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्या योग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.
● *पहाण्याची ठिकाणे* :
कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्याहून कोकणात उतरणार्या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच टाक आहे. कातळात खोदलेल्या पायर्या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर १ मीटर उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. या हनुमानाने आपल्या पायाखाली पनवतीला जखडून ठेवलेले आहे. मुर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मीत घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील.
किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते, पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. गुहे पासून सुळका उजव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी बांधुन संरक्षित केलेला दिसतो. आजही तेथिल तटबंदी शाबूत आहे. तटबंदी पाहून सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर एक प्रचंड दरड कोसळलेली दिसते. या दरडीमुळे पुढे जाण्याची वाट अडवलेली आहे. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्या मधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. पुढेही अरूंद पायवाटेवरून बाजूच्या दगडाला पकडत पुढे जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने बरोबर रोप असल्यास हा भाग पार करावा. अन्यथा आल्या मार्गाने परत जाऊन हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच दरड कोसळलेली पाहायला मिळते. हे टाक पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली दुर्गफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :
मुंबई -पनवेल - पेण मार्गे मुंबई- गोवा महामार्गावरील कोलाड गाव (१२० किमी) गाठावे. कोलाड गावाच्या पुढे डाव्याबाजुला ताम्हणी घाटमार्गे पुण्याला जाणारा रस्ता आहे तो पकडावा. ताम्हणी घाटाच्या अगोदर वरचीवाडी गाव आहे. तेथे मुख्य रस्ता सोडुन उजव्या बाजुला बागड गावाला जाणारा रस्ता पकडावा. हा रस्ता बागड एम आय डी सी - तासगाव - कांदळगाव- बामणवाडी मार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या जिते गावात जातो. जिते गावातून साधारणपणे २ ते २.३० तास चालल्यावर आपण चार सहा घरांच्या वाडी जवळ पोहोचतो. येथे शाळा आहे. वाडीतून ३० मिनिटात आपण गडाच्या प्रवेशव्दारात दाखल होतो.
● *राहाण्याची सोय* :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
● *जेवणाची सोय* :
जेवणाची सोय स्वत: करावी. ● *पाण्याची सोय* :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ● *जाण्यासाठी लागणारा वेळ* :
जिते गावातून अडीच ते तीन तास लागतात.
● *जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
सप्टेंबर ते मार्च.
● सूचना :
रोप(४० फ़ुटी)बरोबर बाळगावा.

*किल्ल्याची ऊंची* : 2020 फूट
● *किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग ● *डोंगररांग* : ताम्हणी घाट
● *जिल्हा* : रायगड , महाराष्ट्र
● *श्रेणी* : मध्यम

No comments:

Post a Comment