Followers

Saturday, 25 July 2020

वैराटगड





वैराटगड :
वैराटगड हा किल्ला सुध्दा राजा भोज याने ११ व्या शतकामध्ये बांधला. या गिरीदुर्गाची उंची समुद्रसपाटीपासून ३३४० फूट आहे. शिवाजी महाराजांच्या काळात याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश केला. ब्रिटीशांनी इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला काबिज केला.
या गडाचा घेर मोठा. थोडासा पूर्व-पश्चिम असा आडवा. जिथे गरज आहे तिथे तटबंदीचे तोरण लावलेले आहे. सर्पाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरूज, मारगिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, शोचकुपांची योजना आहेत. या तटातूनच पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी खाली उतरते. पाण्याच्या खोदलेल्या टाक्या, तळी, शिबंदीची घरे असे या वैराटगडावर आहे.

No comments:

Post a Comment