Followers
Friday, 10 July 2020
|| किल्ले श्री सिंदोळा ||
|| किल्ले श्री सिंदोळा ||
नाव सिंदोळा
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे, महाराष्ट्र
जवळचे गाव मढ,जुन्नर,पुणे
डोंगररांग मढनेर,माळशेज घाट
सध्याची अवस्था व्यवस्थित
भौगोलिक स्थान
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृद्ध आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणगड,जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखला जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेजघाटाच्या माथ्यावर आहे.
कसे जाल ?
अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुजी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो. आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.
गडाच्या माथ्यावरुन हडसर,चावंड, शिवनेरी तसेचमाळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो.
गडावरील पाण्याची सोय
गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्यामधे अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment