Followers

Saturday 11 July 2020

#किल्ले_राजधेर



#किल्ले_राजधेर -
राजधेर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते.
पुढे तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या पर्यंत जाते, याच रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात.
चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात. राजधोर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड.

राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे.
येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.
गडमाथ्यावर पोहचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी.
आपण उजवीकडची वाट पकडायची, थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो, आजही वाडा चांगल्या स्थितित उभा आहे.
या वाड्याशिवाय येथे बघण्यासारखे काही नाही.
परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची.
या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते.
या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.
येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते.
गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहिर आहे.
येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते.
या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते.
तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो.
वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात.
गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे.
गडमाथ्यावरून मांगी तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो.
गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.

No comments:

Post a Comment