★ #रांजणगिरी_किल्ला ★
{ नाशिक जिल्हा }
किल्ल्याचे नाव : रांजणगिरी किल्ला
किल्ल्याची ऊंची : २७९० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांग : त्र्यंबकेश्वर
श्रेणी : मध्यम
जिल्हा : नाशिक
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचिन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार - गोंडाघाट - अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड(भास्करगड), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला "रांजणगिरी" हे नाव पडले असावे.
◆गडावरील पहाण्याची ठिकाणे :
या किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या सुळक्याला वळसा घालून जावे लागते. प्रस्तरारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन हा सुळका सर करता येतो.
◆गडावर पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या अलिकडे १५ किमी वर मुळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव आहे. डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.
◆राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
◆जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
◆पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
◆गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : मुळेगावातून गडावर जाण्यास एक तास लागतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा🚩
No comments:
Post a Comment