हातगड किल्ला
------------------------
हतगडाला हस्तगिरी असेही म्हटले गेले आहे. सुरगणा हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी राजांचा नाशिकचा दख्खनी लढवय्या किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा हातगड (नासिक) किल्ला राजांना जिंकून दिला. सुरतकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर हा हातगड किल्ला आहे. गुजरातमधील प्रसिद्ध हिलस्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही अधिक उंचीचा हातगड आहे. हतगड किल्ला व परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. हतगडाची सफर आता खूप सोपी झाली आहे. वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची पायवाट बनविण्यात आली आहे. या पायवाटेने वर गेल्यावर हतगडाच्या पायथ्याशी स्थिरावलेली हतगडवाडी पहायला मिळते अन् पूर्वीचे गाव कसे असेल याची प्रचितीही येते. उभ्या कातळात कोरलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अन् त्यानंतर चार उपप्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत आहे. शिलालेखांची अक्षरे पुसट झाली आहेत. .
No comments:
Post a Comment