Followers

Friday, 10 July 2020

| किल्ले श्री रोहिडेश्वर (विचित्रगड)(रोहिडा)(बिनीचा किल्ला) ||



| किल्ले श्री रोहिडेश्वर (विचित्रगड)(रोहिडा)(बिनीचा किल्ला) ||
Yogesh Harischandre
भाग १

रोहिडा किल्ला
नाव रोहिडेश्वर (विचित्रगड)
उंची३६६० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव चिखलावडे,बाजारवाडी भोर
डोंगररांग महाबळेश्वर
सध्याची अवस्था व्यवस्थित
रोहिडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.

भौगोलिक स्थान
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

इतिहास
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्यातहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जूनइ.स. १६७० रोजी शिवाजी महाराजांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंगआणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.

No comments:

Post a Comment