Followers

Sunday, 12 July 2020

#पाटेश्वरची_हिंदू_लेणी







#पाटेश्वरची_हिंदू_लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगर रांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते.#पाटेश्वरची_हिंदू_लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे. पाटेश्वरचा डोंगर चढतांना रस्त्यात दगडात कोरलेली #गणपतीची_प्राचीन_स्त्रीवेषधारी_मूर्ती दिसते.. डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली "विश्वेश्वर पुष्करणी" आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीवर शंकराची दुर्मीळ अशी "अज एकपाद" मूर्ती कोरलेली आहे, या शिल्पातील मूर्तीला एकच पाय कोरलेला आहे.

No comments:

Post a Comment