वर्धनगडावरील वास्तू व पहाण्यासारखी ठिकाणे :
वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्क्कम तटबंदी दिसते. आजही किल्ल्याची
तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्याच्या वर्धनगड गावातून
किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या
प्रवेशद्वारापाशी पोहचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास
लागतो. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या
डौलाने उभ्या आहेत. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे
आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू
होते तर ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसऱ्या टोकाशी
येऊन पोहचते. ही तटबंदी आजही चांगली शाबूत आहे.
दरवाजातून आत शिरल्यावर
डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून
बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच
एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या
आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे.
पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे
टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी
१५ मिनिटे पुरतात. टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री
वर्धनीमातेचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे रंगरंगोटी
केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे.
मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल
लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभाऱ्यात कासवाची
सुंदर मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून एक वाट
खाली उतरते. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात.
Followers
Saturday, 25 July 2020
वर्धनगड
postsaambhar :yogesh bhorkar
सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेवर भांडलीकुंडल नावाचा
जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगावपासून ७
मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे.
किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून
किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. किल्ल्याला लागूनच असलेल्या
लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा
करता येत असे. या गिरीदुर्गाची उंची १५०० फूट आहे व हा गड वर्धनगड गाव व
पुसेगाव या गावांच्या जवळच आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment