Followers

Monday 20 July 2020

कर्नाटक राज्यातला येळ्ळूरचा किल्ला राजहंसगड..

कर्नाटक राज्यातला येळ्ळूरचा किल्ला राजहंसगड... . बेळगाव या बाजारपेठच्या शहराचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला हा भूईकोट बाधण्यात आला होता या किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बेळगावच्या दक्षिणेस एका सुट्या डोंगरावर राजहंसगड हा किल्ला बांधण्यात आला होता या किल्ल्याचा मुख्य उद्देश टेहळणीचा असल्याने किल्ला आटोपशीर आहे... . रट्ट घराण्याने राजहंसगड बांधला त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने दगडाने किल्ला बांधला आणि त्याला आजचे स्वरुप दिले त्यानंतर हा किल्ला विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली दुसरी लढाई पेशवे आणि सुलतान यांच्या मध्ये झाली तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती... .. किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे.... . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ फोटोग्राफी : अंगद अचप्पा...♥️

No comments:

Post a Comment