Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले श्री काळदुर्ग ||







|| किल्ले श्री काळदुर्ग ||

काळदुर्ग
किल्ल्याची ऊंची :1550 फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर
श्रेणी : मध्यम

पालघर भागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.

इतिहास
खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणने योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खुण यावर नाही. हे एक टेहाळणीचे स्थान असावे असे वाटते.

पहाण्याची ठिकाणे :
काळदुर्गला हा टेहळणीचा किल्ला होता.
किल्ला दोन स्तरांत विभागला आहे.एक गडमाथा आणि खालचे पठार.
गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच आहे. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे.
गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. येथे एक कुंडदेखील आढळते. पठारावरुन गडमाथ्यावर जाण्यास २ ते ३ पायर्‍या आहेत. पठारावर पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्यावरुन आजूबाजूच्या परिसर दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :
वाघोबा खिंड मार्गे :-
मुंबईहून विरारमार्गे पालघर गाठावे. अथवा कल्याणहून एसटीने पालघरला जावे. पालघरहून मनोरेला जाणारी बसने ८ कि.मी. वरील ’वाघोबा’ नावाच्या देवळाच्या (’वाघोबा खिंड") थांब्यावर उतरावे. येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते. या ’वाघोबा’ देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. ’हातपंप’ ही खूण लक्षात ठेवणे. हातपंपच्या समोरुन वर जाणारी वाट पकडावी. ही वाट पुढे तीन भागांत विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी, सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येतो.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघोबा खिंडीतून दीड तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुत जाता येते.

No comments:

Post a Comment