Followers

Tuesday, 21 July 2020

# किल्ले पुरंदर ##


# किल्ले पुरंदर ##

पुरातन काळापासून सासवड आणि पुरंदर किल्ल्याचा संबंध घनिष्ठ व जिव्हाळ्याचा आहे. प्राचीन ग्रंथातून याचा उल्लेख" इंद्र निल "अथवा इंद्रकिल असा आढळतो .
तेहतीस कोटी देवस्थळी ।
पश्चिम पूर्व बैसला भूमंडळी |
तप त्तपिनले चंद्रमोळी ||
।इथे इंद्रकिल पर्वती|
या ठिकाणी पूर्वी ब्रम्ह्याचे स्थान ।
येथे तप केले गहन ।
महादेव येऊनि आपण ।
प्रसन्नझाले
|इंद्रनील पर्वत रूप यासी ।
साक्षात नारायण स्वरूप ।
कौडण्यपुरी निक्षेप|
योगिनी माता प्रत्यक्ष ।
राम - रावण युद्धामध्ये लक्ष्मणास' शक्ती" लागून मूर्च्छित झाला असता, हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेला. वाटेत जे पर्वताचे खडे पडले तो हा" इंद्रनील ".
द्रोणागिरीवरील'" औषधी असलेला हा पुरंदर
रामचंद्र पंत अमात्य म्हणतात" संपूर्ण राज्याचे सर ते दुर्ग. हे राज्य" तीर्थरूप थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराज "यांनी गडावरूनच निर्माणकेले.
अनेक वीरांच्या रक्ताने त्यास अभ्यंग स्नाने घालून ती स्थळे पवित्र बनली आहेत. म्हणूनस हे दुर्ग आम्हास" तीर्थरूप "आहेत ."
रात्रकूट चालुक्य पासूनसुरु झालेल्या या पर्वताचे मोगल ,मराठे आणि ,पेशवाईच्या काळात अनेक स्थित्यंतरे झालेली दिसतात .
द्रोणाचल चंद्राचंल ।
हनुमंते आणिला विशाल |
त्याचा शाखा अधोमुळं |
तो हा इंद्रनील ।
येथे वल्ली सुवर्ण कारा ।
गुप्ता असती निर्धार ।
रात्री समई त्या दीप्तिकारा ।
जनासी दिसती ।
या किल्ल्यावर दुसऱ्या महायुध्यात इंग्रजांनी जर्मन कैदी ठेवले होते त्यामध्ये एक बॉटॅनिस्ट होता त्याच नाव होत 'सांता पाव ."
किल्ल्यावर कैदी म्हणून फिरताना त्याला खूप औषधी वनस्पती पुरंदर किल्ल्यावर सापडल्या. त्यात दम्यावर चांगला उपचार व प्रभावी वनस्पती होती Licorice (Glycyrrhiza glabra)Coleus Forskohlii (Plectranthus barbatus)Grindelia (Grindelia spp.). Maritime Pine Bark (Pinus pinaster) या बरोबरच मुतखडा संधिवात जुलाब त्वचा विकार यावर वापरल्या जाणाऱ्या वनस्पती C. fistula, Martynia annua, Amorphophalus commutatus, Calotropis gigantea, Pongamia pinnata,Cassia tora या वनस्पती त्याला सापडल्या
. त्याने" पुरंदर अँड हिज मेडिसिनल प्लांट्स" नावाचे पुस्तक नंतर लिहिले. त्यात त्याला वाटाड्या म्हणून" सोनबा धनगर" नावाचा वाटाड्या पोरगा मिळाला .
मोठा हुशार असलेला "जानकर सोनबा" याने कोणकोणत्या मुळ्या ते शास्त्रज्ञ काढतो व गडावरील कोणत्या प्रकारच्या रोग्यांना देतो ते लक्षात ठेवले.
इंग्रज गेले या सोनबा ने मात्र कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ना ठेवता वर्षानु वर्षे पुरंदर किल्ल्यावर मुळ्या , शोधून वनस्पती शोधून लोकांना औषधे देऊन आयुष्यभर सेवा केली.
या सोनबाकडे" वेणूताई यशवंतराव चव्हाण" यांनीही औषधे घेतली होती .
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली लढाई या किल्ल्यावर लढून विजापुरास फत्तेखानास पळवून लावले व सस्वराज्याचा श्रीगणेशा केला .
"शिवाजी राजे पुरंदर बैसोन दिवाण दिवाण नाम जादिसी झगडू लागले."
पुरंदर हि शिवाजी महाराजांची राजधानी झाली. इंद्रदेवापासून ते शिवाजी महाराजांपर्यंत व त्यांच्या लाडक्या पुत्राचा म्हणजे छत्रपतींचा जन्म याच किल्ल्यावर झाला कि ज्याच्या मृत्यूने आखिल महाराष्ट्राला राजा नसतानाही पंचवीस वर्षापर्यंत जागृत ठेऊन औरंजेबाला आपली हाडे येथेच ठेवायास लावली त्या मृत्युन्जय "संभाजी महाराजांचा " जन्म याच पावन भूमीत १४ मे १६५७ रोजी झाला(शके १५७९ जेष्ठ शुद्ध १२ गुरुवार घटिका १०संभाजी राजे पुत्र पुरंदर उपजले ) .
पुरंदर म्हणजे अत्यंत बुलंद बाका , किल्ला . महाराजांनी तो निळकंठराव सरनाईक या( चांबळी तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे ) किल्लेदार सरदाराकडून प्रेमापोटी मिळवला होता .
गडाच्या परिसराला घेरा म्हणतात या परिसरात राहणाऱ्या कोळी आणि रामोशी समाजातील तरुण या गडाचे रखवालदार
. हा गड स्वराज्यात आला तेंव्हा महाराजांनी त्याचीडागडुजी सुरु केली पण पश्चिमेस असलेल्या शेंद्र्या बुरुजाचे काम सारखे ढासळायचे .
या माझ्या तालुक्यातील " येसाजी नाईक चिव्हे" या चिव्हेवाडी तालुका -पुरंदर जिल्हा पुणे याने आपली सून व मुलगा जिवंतपणी या बुरुजास बळी म्हणून बुरुजात गाडून टाकले........
. "येसाजी नाईक चिव्हे म्हणो लागले ",जे मी आपला पुत्र व सून देतो मग बहिर्जी सोननाक याचा पुत्र नाथनाक व देवकाई अशी उभयता आश्विन वाद्य अष्टमीस शेंदरी बुरुजात गाडली मग बुरुजाचे काम सिद्धीस गेले ."........
'या बळी दिलेल्या जोडप्याच्या अंगावर शेकडो तोळा सोन्याच्या विटा ठेवल्या होत्या असे कित्येक वर्ष लोक म्हणत आले आहेत .
खरे खोटे इतिहासालाच माहित.....
...... १६६५ ला दुसरी जंग झाली. पुरंदरवर दिलेरखान व मुरारबाजी देशपांडे. . मुरारबाजी युद्धात पडले रक्ताने गड न्हाऊन निघाला . राज्यांनी तह केला मिर्झाराजे जयसिंगाबरोबर......
या किल्ल्याचे नाव औरंजेबाने आजमगढ ठेवले . पुढे ५ वर्षांनी १६७० मध्ये निळोपंत मुजुमदारानी पुन्हा पुरंदरवर छापा घालून स्वराज्यात आणला गडावर जरीपटका मानाने फडकू लागला .
शाहू महाराज दिल्लीतून आल्यावर हा किल्ला बालाजी विश्वनाथ पेशव्यांना दिला. पेशवाई काळात सुमारे १७२७मध्ये त्यानंतर पुरंदर किल्ल्यावर नाणे पडण्याची टांकसाळ होती .
नंतर हा किल्ला सरदार अंबाजी पंत पुरंदऱ्यांकडे आला सन १७६१पर्यंत तो सरदार पुरंदर्यांकडे होता . नारायणराव पेशवे यांच्या मृत्यू नंतर त्यांची गरोदर पत्नी" गंगाबाई "हिस बारभाईने पुरंदर किल्ल्यावर ठेवले.
वैशाख शुद्ध सप्तमी शके १६९६ सोमवारी पुरंदरचे माचीस पुत्ररत्न झाले मुलाचे नाव सवाई माधवराव ठेवले .
बारशाच्या प्रसंगी सवाई माधवरावास पेशवे पद प्राप्त झाले सर्वत्र आनंदी आनंद झाला. पुरंदरच्या संबंधित लोकांना इतमामाप्रमाणे गावे मोकाशे जमिनी इनाम मिळाली
पुढे काही काळ पुरंदर हीच पेशव्यांची राजधानी असल्याचे दिसून येते . पेशवाईच्या अस्तापर्यंत गड मराठ्यांकडे होता .
१८१८ मध्ये दुसरा बाजीराव व इंग्रज अधिकारी एल्ड्रिज यांच्यात युद्ध होऊन गड मराठ्यांच्या ताब्यातुन घेतला.येथेच स्वराज्याची इतिश्री झाली ...
गडाचा इतिहास प्रेरणादायी रमणीय ,स्फुर्तिदायी प्रेरक आहे . गडाच्या शेंदर्या बुरुजाकडे पाहताना हृदयात मात्र चर्रर्र होत "नाथनाक व देवकाई चिव्हे" यांचे स्मरण होऊन गालावरू दोन असावे चटकन नकळत ओघळु लागतात ......

No comments:

Post a Comment