"गडकिल्ल्यांचे स्थापत्य: भारतवर्षाची प्राचिन परंपरा"
भाग 2
पोस्टसांभार : श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
* *मनुस्मृतितील किल्ल्यांचे उल्लेख*
मनुस्मृतीतील सातवा अध्याय यामध्ये दुर्गांचे सहा प्रकार त्याच्या बलस्थानानुसार ठरवले आहेत ते कसे पाहूयात-
1) धनदुर्ग : वाळवंटात बांधले जाणाऱ्या किल्ल्यास धनदुर्ग असे म्हटले जाते.
2) महीदुर्ग : ज्या किल्ल्याची तटबंदी बारा हात उंच आहे आणि त्याच्या तटावरून घोड्यावर बसून फिरता येते आणि शत्रूवर टेहाळणी करता येते असा किल्ला.
3) अब्दुर्ग : पाण्याने चहु बाजूंनी वेढलेला किंवा जलदुर्ग म्हटले जाते उदा.सिंधूदुर्ग ,जंजिरा ,पद्मदुर्ग इ.
4) वृक्षदुर्ग : जंगलाच्या मधोमध असणाऱ्या किल्ल्याचे वृक्षदुर्ग किंवा जंगली किल्ले असे म्हणण्यात येते. उदा. वासोटा, प्रतापगड इ.
5) नुदुर्ग : गजदल, अश्वदल आणि सैन्याच्या सहाय्याने रक्षित केलेल्या किल्ल्यास नुदुर्ग म्हटले जाते. उदा. लाल किल्ला.
6) गिरिदुर्ग : उंच अशा पर्वतावर बांधलेल्या किल्ल्यास गिरिदुर्ग असे म्हटले जाते. उदा. राजगड, रायगड, तोरणा इ.
तर ऋग्वेदात अशा प्रकारे किल्ल्यांचे प्रकार पाहवयास मिळतात. तसेच किल्ल्याच्या आतील नगररचनेसंदर्भात देखील काही नियम सांगितले आहेत.
किल्ल्यावर शस्त्रसाठा हा भरपूर प्रमाणात असावा, धनधान्यांनी कोठारे भरलेली असावीत, किल्ल्यात ब्राम्हण, लोहार, सोनार आणि उत्कृष्ट कारागिरांचा भरणा असावा. किल्ल्याच्या मधोमध राजवाडा बांधलेला असावा.
* *महाभारतातील पुरावे*
भारतीय महाकाव्य जे सत्यघटनेवर आधारित आहे ते म्हणजे महाभारत. आजही ते बर्याच लोकांना फक्त काव्यच वाटते, ज्यात पांडवांना वाटणीत मिळालेल्या खांडव वनात इंद्रप्रस्थ उभे करायचे असते त्यावेळी धर्मराज म्हणजेच ज्येष्ठ पांडव युधिष्ठीर पितामह भीष्माकडे किल्ला बांधण्याचे शास्त्र शिकण्यास जातो असा उल्लेख सापडतो.
त्यानंतर श्रीकृष्णाने बांधलेल्या द्वारकेचे वर्णन सुद्धा वाचायला मिळते. आजच्या अगदी अलीकडच्या काळात भारतीय नाविक दलाच्या सहकार्याने आणि बऱ्याच लोकांनी सागराच्या तळात केलेल्या संशोधानात हे सिद्ध सुद्धा झाले आहे कि द्वारका अस्तित्वात होती जी आता सागर तळाशी आहे . तर अशाप्रकारे गडकिल्ल्यांसंदर्भात पुरावे सापडतात.
No comments:
Post a Comment