दुर्गांची प्रमुख अंगे
भाग 3
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
🚩बुरुज 🚩
तटबंदीला आधार मिळावा म्हणून बुरुजांची निर्मिती केली जाते. कधी कधी किल्ल्याच्या कमकुवत बाजूवर सुद्धा बुरुज बांधला जातो.
महादरवाजाच्या दोन्ही बाजूस बुरुजांची संरक्षणात्मक ढाल असते. ( बुरुज म्हणजे आजचा पिलर असे आपण म्हणू शकतो) बुरुजाची निर्मिती करताना त्याचा पाया शिस्यांनी आणि गूळ, चुन्याने भरतात. तटबंदीवर दर शंभर ते दीडशे फुटांवर बुरुंज बांधला जावा असे शास्त्रात सांगितले आहे. बुरुजातील माती व दगड हत्तीच्या सहाय्याने दाबून बसवले जातात. बुरुजावरून सहज मारा करता यावा म्हणून त्यावर जंग्या व कोनाडे काढलेले असतात. अशाच जंग्या तटबंदीवर सुद्धा असतात.
बऱ्याचवेळा तोफा ह्या बुरुजावर ठेवलेल्या असतात कारण तोफ डागल्यावर येणारे बॅक प्रेशर बुरुंज सहज सहन करू शकतो. तसेच बुरुजांमुळे बऱ्याचवेळा तटबंदीचे संरक्षण होते. भारतात अनेक प्रकारचे बुरुज पाहण्यास मिळतात उदा : अर्धगोल, पूर्णगोल, द्विदल, त्रिदल, चौकोनी, नौदलीय आणि टेहाळणी बुरुंज.
उदा : धाराशिव (उस्मानाबाद ) येथील नळदुर्ग किल्ल्यावरील नौदलीय म्हणजेच नऊ पाकळ्यांचा बुरुंज बघण्यासारखा आहे .तसेच ह्याच किल्ल्याच्या मध्यभागी टेहाळणी बुरुंज सुद्धा अभ्यासनिय आहे.
No comments:
Post a Comment