महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व
भाग १
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!"
ह्या प्रसिद्ध अशा कवितेतील ओळीतून गोविंदाग्रजांनी अतिशय समर्पकपणे
सह्याद्री आणि महाराष्ट्राचे वर्णन केले आहे.'राकट देशा दगडांच्या देशा' ही
वरील उपमा सह्याद्रीला आणि सह्याद्रीत राहणाऱ्या मावळ्यांना लागू होते.
तसं पाहिलं तर त्या त्या भागातील भूगोलाचा आणि नैसर्गिक जैवविविधतेचा
त्या त्या भागातील इतिहासाशी परस्पर संबंध असतो. ह्याच भौगोलिक
परिस्थितीमुळे त्या भागातील स्वभाव वैशिष्ट्य ठरते. त्यामुळेच राकट
दगडांचा असलेला हा महाराष्ट्र देश राकट, कणखर, चिवट स्वभावाच्या लोकांचा
आहे.
ह्या महाराष्ट्राच्या खोलात दडलाय हा इतिहास. जवळजवळ दोन हजार
वर्षांचा इतिहास आहे हा आणि ह्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर
गडकिल्ले ह्यासारखे दुसरे विश्वासाचे साधन नाही.
ह्या पवित्र भूमीतील
सर्वांत जुने शासक म्हणजेच सातवाहन किंवा त्यांस दक्षिणापथवती सातवाहन असे
सुद्धा म्हटले जाते. सातवाहन घराण्याने जवळ जवळ 500 वर्षे महाराष्ट्रावर
राज्य केले. ह्या दरम्यान महाराष्ट्राला आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक
स्थैर्य सातवाहन कालीन पराक्रमी राजांनी दिले.
तिसऱ्या शतकाच्या
मध्यावर वाकाटकांचे राज्य विदर्भात आले. जवळ जवळ 250 वर्षे हे राज्य
टिकले. इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्य घराण्याचा उदय
झाला.चालुक्यांचा पराभव करून राष्ट्रकूटांनी त्यांची 200 वर्षांची सत्ता
संपुष्ठात आणली. राष्ट्रकूटांनी 8 व्या शतकापासून ते 9 व्या शतकाच्या
मध्यापर्यंत राज्य केले.
साधारण 8 व्या शतकात महाराष्ट्रातील काही
पश्चिम भागावर शिलाहार वंशीय घराण्याचे राज्य होते. हे शिलाहार राज्य तीन
भागात विभागले होते. त्यापैकी पहिली शाखा मुंबई, रायगड आणि ठाणे हे
जिल्हे तर दुसरी शाखा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा यांची राजधानी
वलीपट्टण म्हणजेच रत्नागिरी येथील खारेपाटण आणि तिसरी शाखा सातारा,
कऱ्हाड, कोल्हापूर आणि बेळगाव त्यांची राजधानी वडिवळे म्हणजे राधानगरी ही
होय. पन्हाळा हा किल्ला शिलाहार वंशीय राजांनी बांधला आहे.
No comments:
Post a Comment