वैभव महाराष्ट्राचे!
खोपोली - पेण - अलिबाग महामार्गावर पेण गावच्या बायपासने पुढे दावनसर मार्गे मुंगोशी गावी पोहचतो. तेथून घाट चढून पुढे गेल्यावर किल्ले सांकशी उर्फ बद्रुद्दिन गडाचे पहिले दर्शन होते. गडाच्या पायथ्याशी बद्रुद्दिन शहा दर्गा आहे. जवळच एक मोठा तलाव आणी काही इमारती आहेत. तेथे सावलीत गाड्या लावून गडाकडे निघावे.
गडाच्या उत्तर बाजूने गड चढाईस सुरूवात केल्यावर, पटापट पहिला व दुसरा टप्पा चढून पुढे तीसरा टप्पा गाठताणा वाटेत तटबंदी व बुरूदाचे अवशेष दिसतात. उजवीकडे कातळात असलेले एक खांबी पाण्याचे टाक पाहून गडाचा माथा चढायचा. चढताना पुढे पाण्याचे कोरडे टाके आणी उध्वस्त वाड्याचा चौथरा दिसतो. समोरच भगवा ध्वज फडकत असतो. तेथून उजवीकडे दोन कोरडी टाकी आहेत. तेथून दक्षिणेस पसरलेली गडाची माची दिसते. तिकडे जाण्यासाठी थोड खाली उतरावे लागते. त्या खोलगट भागातील कातळात एक चौकोन कोरलेला आहे. तेथेच डावीकडे गडाच्या दरवाज्याचे अवशेष आहेत. पुढे माचीवर पाण्याची एकत्रित अशी बरीच टाकी व असंख्य छोटे छोटे खड्डे आहेत. माथ्यावर पाणी कोठेच नाही. पुढे गडापासून खिंडीने वेगळी झालेली डोंगरांग दिसते. गडावरून माणिकगड, नागफणी आणी कर्नाळा दिसतो.
पडक्या दरवाजातून गड उतरायला सुरूवात करावी. तेथून
अरुंद वाटेने खाली सावकाश उतरावे, कारण ही वाट पुर्णपणे कातळातून जाते.
काही ठिकाणी थोडी अवघड आहे तर काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या आहेत. म्हणजे
हा गडाचा राजमार्ग! एक टप्पा खाली आल्यावर डावीकडे कातळकोरीव पाण्याची तीन
टाकी आहेत. यात पिण्यायोग्य पाणी आहे, तर त्यांची वाट खुपच अरूंद आहे.
टाक्यांच्या खांबावर नक्षीकाम केलेले दिसते. पुढे अजून एक टप्पा खाली
उतरल्यावर बरीच टाकी आहेत, त्यात काही गुहेसारखी खुप प्रशस्त आहेत. तेथेच
वाटेला चिटकूण कातळात कोरलेल जगाई देवीच मंदिर आहे. ते पाहून अजून एक टप्पा
खाली उतरल्यावर जेमतेम एक पाय बसेल अशा पायऱ्यांनी कातळाला चिटकून डावीकडे
गेल्यावर एक प्रशस्त टाके आहे. त्यात पाणी असते. तेथून पायऱ्यांनी खाली
उतरून सपाटीवर आल्यावर झाडामध्ये लपलेली गडाची बुरूज तटबंदी आहे. मात्र ती
शोधावी लागते. तेथून झाडातून मळलेल्या वाटेने चालत परत दर्ग्यापाशी यावे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment